शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप स्पर्धा आणि जलशुक्त शिवारची पाहणी

By admin | Updated: May 6, 2017 00:32 IST

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची

वर्धा : सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या सावंगी पोळ या गावात श्रमदानातून झालेल्या विविध विकासकामांची शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी यावेळी खा. रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आ. डॉ. पंकज भोयर, अप्पर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, माजी आमदार दादाराव केचे, सरपंच वर्षा धुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळ हा मानवनिर्मित आहे. शासन पुन्हा जलयुक्त शिवारच्या माध्यमातून निसर्गाशी मैत्री साधत आहे. वॉटरशेडच्या माध्यमातून नैसर्गिक क्षमता पुनरुज्जीवित करण्यासाठी माथा ते पायथा काम सुरू आहे. निसर्गाकडून घेतलेले निसर्गाला परत करण्यासाठी सावंगी पोळ या आदिवासी बहुल गावातील गावकरी जी मेहनत घेत आहे, त्यावरून पुढील ५० वर्षे यागावात दुष्काळ येणार नाही. मित्र म्हणून सरकार तुमच्यासोबत आहे. परिवर्तन घडत निसर्गाशी सर्वांची मैत्री झाली असून त्यातून दुष्काळ मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. आपल्या देशात अनेक संस्कृती व सभ्यता संपल्या आहेत. मात्र आदिवासी संस्कृती अजूनही जिवंत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे आदिवासी समाजाने निसर्गाचे शोषण नव्हे तर रक्षण केले आहे. असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, वॉटर कप स्पर्धेत काम करणारे सर्वच नायक असल्यचे ते म्हणाले. यावेळी पाणी फाउंडेशनचे मंदार देशपांडे व उपस्थितांनी जल है तो कल है, दुष्काळाला लाथ मारा, असे नारे देऊन वातावरण जोशमय केले. जलसंधारणाच्या कामात योगदान देणाऱ्या दिलासा संस्थेचे रवींद्र तांदळकर, आर्ट आॅफ लिव्हींगचे मनीष बदे, मनीष भाटे रोटरी क्लब नागपूर, बजाज फाउंडेशन मार्फत महेंद्र फाटे, रोटरीचे डॉ. सचिन पावडे, ग्रामविकास अधिकारी बोबडे यांच्यासह विरुळ सरपंच साधना उईके यांनी सहा महिन्यांचे बाळ असताना काम केले त्याबद्दल त्यांचा मुख्यमंत्र्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. यानंतर पांदण रस्ते माहिती पुस्तीकेचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आर्वी तालुक्यातील पुनर्वसित १७ गावातील ४,४०० सातबारा तयार झाले असून त्यात प्रतिनिधिक स्वरुपात विनोद खांडेकर (नेरी), भीमराव तुमस्कर, भावराव कोरे यांना सातबाराचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.(प्रतिनिधी) वॉटर कपमधून पाच लाख घनमीटर पाण्याच्या निचऱ्याची अपेक्षा वॉटर कप स्पर्धेत ८ एप्रिल ते ४ मे २०१७ या २७ दिवसात १ लाख ७५ हजार घनमीटर पाणीसाठा होईल एवढी कामे झाली असून ५ मे ते २२ मे या कालावधीत होणाऱ्या कामातून ५ लाख घनमीटर पाणीसाठा अपेक्षित आहे. या कामातुन ४५ हजार मनुष्य दिवस काम अपेक्षित आहे. यशोदा नदी खोरे पुनरुज्जीवन अंतर्गत ६३० किलोमीटर सरळीकरण व खोलीकरण होणार आहे. याचा फायदा ४ तालुक्यातील १४३ गावातील २८ हजार शेतकरी कुटुंबाना होणार आहे.