शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉश आऊट’ मोहीम पुढे पाठ मागे सपाट

By admin | Updated: September 26, 2015 02:09 IST

गावठी दारू नष्ट करण्याकरिता गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात येत आहे.

नऊ महिन्यात ४७ कारवाया : ८२.६० लाख रुपयांचा मोहा सडवा व साहित्य नष्ट वर्धा : गावठी दारू नष्ट करण्याकरिता गृह विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात ‘वॉश आऊट’ मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहर पोलसांनी गावठी दारूच्या भट्ट्या असलेल्या आनंदनगर, इतवारा, पुलफैल या भागात तब्बल ४७ वेळा कारवाई केली. प्रत्येक मोहिमेत लाखोंचा मुद्देमाल नष्ट केल्याचे समोर येत असले तरी येथे भट्ट्या सुरूच आहेत. पोलीस पाठमोरे होताच येथे पुन्हा गावठी दारू गाळण्याकरिता भट्ट्या सुरू होतात. यामुळे पोलिसांची ही ‘वॉश आऊट’ मोहीम पुढे पाठ मागे सपाट ठरत असल्याचे समोर येत आहे.शासनाच्या आदेशानुसार वॉश आऊट मोहीम मे २०१५ पासून राबविण्यात आली. वर्धा पोलिसांद्वारे ही मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. असे असतानाही त्यांच्या कारवाईचा या दारूविक्रेत्यांवर कुठलाही परिणाम होत नसल्याचे दिसून येते. याला पोलीस विभागातील काही कर्मचारीच या दारू विक्रेत्यांचे खबरे झाल्याचे समोर आले आहे. याचा त्रास काही कर्तव्यदक्ष पोलिसांनाही झाला आहे. काहींवर मारही खाण्याची वेळ आली.९३ जणांना प्रतिबंधात्मक नोटीस शहरातील या भागात गावठी दारू गाळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्यांपैकी एकूण ९३ जणांना हा व्यवसाय करण्यास प्रतिबंध घालत असल्याची नोटीसही पोलीस विभागाच्यावतीने बजावण्यात आली आहे. असे असतानाही ते बिनदिक्कत व्यवसाय करीत आहे. त्यांना वारंवार अटक करण्यात येते, मात्र न्यायालयातून जामीन घेत ते पुन्हा हाच व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले आहे. यामुळे यावर काय मार्ग काढावा यासंदर्भात शासनाने सूचना कराव्या असे पोलीस विभाग म्हणत आहे. अटकेचे प्रमाण कमीवर्धा पोलिसांच्यावतीने मे २०१५ मध्ये वॉश आऊट मोहीम राबविण्यात आली. या माहिेमेत दारू गाळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. यात त्यांना अटक होत नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा तोच व्यवसाय सुरू होत असल्याचे समोर आले आहे.