शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत अंतर्भाव करावा

By admin | Updated: October 27, 2014 22:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे.

निवेदनातून शासनाला साकडे : सामाजिक संघटनांची मागणीवर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थसंकल्पात स्मार्ट सिटी प्रकल्प राबवण्यिाबाबत नियोजन केले आहे. देशातील निवडक शहरांचा या योजनेंतर्गत समावेश करुन कायापालट करण्यात येणार आहे. या शहरांच्या यादीत वर्धा शहराचा समावेश करण्यात यावा. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास सर्वांगीण विकास होईल, अशी मागणी येथील विविध संघटनांनी प्रशासनाला निवेदनातून केली आहे. या निवेदनाची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी, जिल्ह्याचे खासदार रामदास तडस, वर्धा विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. पंकज भोयर यांना देण्यात आली आहे. या निवेदनानुसार, वर्धा जिल्ह्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी व आचार्य विनोबा भावे यांचे वास्तव्य होते. देशात जिल्ह्याची ओळख गांधी जिल्हा म्हणून आहे. स्वातंत्र्य समरातील अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांचा येथील सेवाग्राम आश्रम साक्षी आहे. शिवाय जिल्ह्यात वनसंपदा आणि व्याघ्र प्रकल्प असल्याने येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मात्र येथील पर्यटन स्थळांचा अद्याप पुरेसा विकास झालेला नाही. शहराचा स्मार्ट सिटीत समावेश केल्यास जागतिक वारशाचे जतन करता येईल. भौगोलिकदृष्ट्या जिल्ह्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. देशभरात चारही दिशेला जाण्याकरिता येथून रेल्वेगाडी उपलब्ध आहे. शिवाय शहराच्या परिसरात असलेले शैक्षणिक संस्थाचे जाळे, अद्यावत रुग्णालय यामुळे येथे दुरवरुन लोक उपचार घ्यायला येतात. लगतच्या जिल्ह्याचे विद्यार्थी शिक्षणाकरिता येतात. नागपूरसह वर्धा शहराचा स्मार्ट सिटीत समावेशाची शिष्टमंडळाने मागणी केली.(स्थानिक प्रतिनिधी)