शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

वाघोली रेतीघाटावरून पोकलँडसह ट्रॅक्टर जप्त

By admin | Updated: April 18, 2016 04:24 IST

जिल्ह्यात रेती माफियांची शिरजोरी सुरूच असल्याचे वाघोली रेतीघाटावर दिसत आहे. येथे पोलिसांनी कारवाई करीत रेतीचा

वर्धा : जिल्ह्यात रेती माफियांची शिरजोरी सुरूच असल्याचे वाघोली रेतीघाटावर दिसत आहे. येथे पोलिसांनी कारवाई करीत रेतीचा उपसा करण्याकरिता लावण्यात आलेला पोकलँड व एक ट्रॅक्टर जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. यात एकूण २५ लाख ७४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या कारवाईत घाटावर कार्यरत असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. मुन्ना सुखराम यादव (२०) रा. देरवा, व निवृत्ती चंद्रशेखर मोकदम (२४) रा. फत्तेपुर अशी त्यांची नावे आहेत. तर या प्रकरणात रेती घाट मालक प्रणव गौरखेडे रा. तिवसा व हुकूम जागे या दोघांविरूद्ध तळेगाव (श्यामजीपंत) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
जिल्ह्यात रेती माफियांकडून नियमांना तिलांजली देत रेतीचा उपसा सुरू आहे. राज्यात छापील रॉयल्टी बंद असताना येथे त्याच रॉयल्टीवर रेतीची उचल होत असल्याचे अनेक वेळा समोर आले. या रेती माफीयांवर अंकुश लावण्याकरिता पोलीस व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून संयुक्त कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला आहे. मात्र त्यांना अंकुश लावण्यात अपयश आल्याचेच दिसून येत आहे.
पोलिसांच्यावतीने होत असलेल्या कारवाई दरम्यान तळेगाव हद्दीतील वाघोली रेतीघाटातून मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा होत असल्याची माहिती मिळाली. यावरून पोलिसांनी वाघोली घाट सर्व्हे क्रमांक ५ ची पाहणी केली असता नदी पात्रात क्रमांक नसलेला एक पोकलँड व बाजूला ट्रॅक्टरच्या ट्रॉवर जाळी लावून रेतीचा उपसा होत असल्याचे दिसून आले. यावेळी पोकलँड चालक मुन्ना सुखनारायण यादव व रेती घाटावर हजर असलेला निवृत्ती चंद्रशेखर मोकदम (२४) याला पोलिसांनी विचारपूरस केली असता त्याने रेतीघाट मालक प्रणव गौरखेडे याच्या सांगण्यावरून हुकूम जागेच्या आदेशाने पोकलँडने रेतीचा उपसा करून ढिगारे लावण्यात येत असल्याचे सांगितले. यावरून मुन्ना यादव व निवृत्ती मोकदम रा. फत्तेपुर या दोघांना अटक करण्यात आली. तर रेतीघाट मालक प्रणव गौरखेडे रा. तिवसा व हुकूम जागे याच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३७९, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत एकूण ६० ब्रास रेती व साहित्य असा एकूण २५ लाख ७४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हा नोंद करून प्रकरण तळेगाव पोलिसांकडे सोपविण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा व महसूल विभाग यांनी संयुक्तरित्या राबविली.(प्रतिनिधी)

कारवाईनंतरही रेतीचा उपसा
४वाघोली येथील रेतीघाट तिवसा येथील प्रणव गौरखेडे याने घेतला आहे; मात्र त्याच्याकडून येथून मोठ्या प्रमाणात नियमांना तिलांजली देत रेतीचा उपसा होत असल्याचे समोर आले. यावरून बुधवारी आष्टी (शहीद) येथील तहसीलदार सीमा गजभिये यांनी या घाटावर कारवाई केली. त्यांनी घाटावरील पोकलँड जप्त करण्याची कागदी कारवाई करीत तो नेण्याकरिता साहित्य नसल्याचे कारण काढत तिथेच ठेवला. पोकलँड घाटावरच असल्याने घाट मालकाने जप्त पोकलँडच्या सहायाने रेतीचा उपसा केल्याचे या कारवाईत समोर आले. असे असले तरी यात महसूल विभागाकडून अनागोंदी झाल्याची चर्चा पोलीस विभागात जोरात आहे.