शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र विठूनामाचा गजर...

By admin | Updated: July 16, 2016 02:19 IST

जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो.

वर्धा विठ्ठलमय : पीक पाणी व समृद्धीसाठी विठूरायाला भक्तांचे साकडे वर्धा : जनी म्हणे नामदेवासी, चला जाऊ पंढरीसी... हा अभंग जनाबाईची पांढरपूरला जाण्याची तळमळ अत्यंत कमी शब्दात व्यक्त करतो. अवघा महाराष्ट्र आषाढी एकादशीला शुक्रवारी पंढरीच्या विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी चंद्रभागेच्या तिरी एकवटो. पण प्रत्येकालाच पंढरपूरला जाणे शक्य होतेच असे नाही. विठ्ठलाच्या दर्शनाची आस तर सर्वांनाच आहे. जिल्ह्यातील सर्वच विठ्ठल मंदिरे विठूनामाच्या गजरात न्हाऊन निघाली होती. अवघी वर्धानगरीच विठ्ठलमय झाल्याचे चित्र आज होते. पीक पाणी चांगले होऊ दे हेच साकडे अंतरमनातून प्रत्येकजण घालत होता. विठ्ठल हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्यदैवत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी पायी दिंडीने पंढरपूरला दर्शनाला जातात. आषाढी एकादशीच्या आसपासच खरीपाची पेरणी होत असते. गत काही वर्षांत आषाढी एकादशी येऊनही पावसाचा पत्ता नव्हता. अवघ्या महाराष्ट्रावर दुष्काळी परिस्थितीची दाट सावली पसरली होती. चंद्रभागेचे पात्रही कोरडेठाक होते. भक्त विठ्ठलाला साकडे घालून थकल्यावर कुठे पावसाला सुरुवात झाली होती. पण निसर्गाने साथ न दिल्याने गेली दोन ते तीन वर्ष शेतकरी वर्गाला अत्यल्प उत्पादनातच समाधान मानावे लागले. यंदा मात्र आषाढी एकादशीच्या काही दिवसांअगोदरच राज्यभर पेरणीयोग्य पाऊस झाला. नदी नाले भरून वाहू लागले. विहिरींची पाणीपातळीही वाढली. त्यामुळे यंदा विठ्ठल पावला असे वारकरी बोलतात. या वर्षी पुढेही पावसाने साथ द्यावी, पिकांची वाढ चांगली व्हावी, त्यावर रोगराई पसरू नये, पाणीटंचाई भासू नये, शेतकऱ्यांची कोठारं धान्याने भरावी, अवघ्या देशात सुबत्ता यावी, कसल्याही गोष्टीची मानवाला कमतरता भासू नये असे साकडे भक्त विठूरायाला घालत असल्याचे दिसून आले. गावागावांतील विठ्ठल मंदिरात भक्तांची सकाळपासूनच गर्दी झालेली दिसत होती. गावागावांमध्ये विठ्ठलनामाच्या गजरात हाती भगवी पताका घेऊन नामधून निघाली होती. वर्धा शहरातील बडे चौकातील विठ्ठल मंदिरात तर सकाळपासून भक्तांची रीघ लागली होती. वारकरी महिला मंडळातील महिलाही सकाळपासूनच हरिनामाच्या गजरात रंगून गेल्या होत्या. प्रती पंढरीत उसळली भाविकांची गर्दी घोराड - बोरतिरावर वसलेल्या व संताच्या वास्तव्याने तिर्थक्षेत्रच नव्हे तर प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोराड येथे आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासूनच गर्दी उसळली होती. घोराड येथून पंढरपूरला दोन मार्गाने दोन दिंड्या पोहचल्या आहे. यात अनेक वारकरी सहभागी आहे. संत केजाजी महाराज यांनी १५० वर्षांअगोदर सुरू केलेल्या धार्मिक प्रथा व परंपरा घोराडचे नागरिक व त्यांच्या प्रती श्रद्धा असणारे असंख्य भाविक भक्तगण आजही चालवत आहेत. ४त्यामुळेच आज आषाढी एकादशीला पहाटेच्या वेळेस विठ्ठल रूख्माईची महापूजा सकाळी आरती व त्यानंतर दर पंधरवाडी एकादशीला निघणारी दिंडी नगर प्रदक्षिणा पूर्ण केली दुपारी मंदिरातून निघालेल्या टाळ मृदुंगाचा निनाद, भगव्या पताका घेवून परंपरेनुसार पंचक्रोशी प्रदक्षिणा पूर्ण करून सायंकाळच्या सुमारास मंदिर परिसरात पोहचली. या दिंडीत गावातील नागरिक, युवक, महिला व भाविक भक्तगणांनी सहभाग घेतला. सकाळपासून तर रात्रीपर्यंत भाविकांनी विठ्ठल रूख्मीणीचे दर्शन घेतले. यामुळे भाविकांची येथे गर्दी जमली होती.