शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

कृषी केंद्रात नियमाचे उल्लंघन

By admin | Updated: July 27, 2014 23:53 IST

कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित

अधिकाऱ्यांचे अभय : साठा, किंमत, तारखेचा फलक बंधनकारकअनिल रिठे - तळेगाव(श्या.प.)कृषी सेवा केंद्रातील दर्शनी भागात दररोज दुकानात व गोदामात असलेला साठा, वाणाची किंमत तसेच परवाना लावणे बंधनकारक आहे़ त्याचप्रमाणे परवाना मंजूर करतेवेळी नमूद दस्ताऐवज उपस्थित ठेवणेही महत्त्वाचे आहे़ या नियमांना मात्र सर्रास तिलांजली देऊन बहुतांश केंद्रामध्ये अवाजवी किंमतीत वाण विकले जात आहेत. याकडे कृषी अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. दुकानात विक्री व साठवणूक करण्यासाठी परवाना घेणे दुकानदारांना बंधनकारक आहे़ या परवान्यामध्ये विक्रीस्थळ व गोदामाचा अचूक पत्ता नमूद करणे महत्त्वाचे आहे़ परवाना नमूद असलेल्या विक्रीस्थळाव्यतिरिक्त इतर ठिकाणांवरून बियाण्याची विक्री करणे तसेच नमूद गोदामाव्यतिरिक्त इतर ठिकाणी साठवणूक करणे हा बियाणे कायदा अधिनियम व नियंत्रण आदेशातील तरतुदीचा भंग आहे़ विक्री केंद्रातून विक्री केला जाणाऱ्या बियाण्यांचा पिकनिहाय व वाणनिहाय तपशील, उत्पादकांचे नाव, उत्पादकाला कृषी आयुक्तांनी विक्री करावयास दिलेल्या परवानगीची तारीख इत्यादी तपशील विक्रेत्यांने सही शिक्यानिशी कृषी विभागाला सादर करणे बंधनकारक आहे़ ज्या उत्पादकांचे बियाणे विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहे़ त्यांना कृषी आयुक्तांनी महाराष्ट्रात विक्रीसाठी दिलेली परवान्याची प्रत, प्रमाणित बियाण्यांसाठी लॉटनिहाय मुक्तता अहवाल तसेच उत्पादन कंपनीच्या पैदासकाराने स्वाक्षरी केलेल्या वाणांचे ओळखता येणारे गुणधर्म ही कागदपत्रे विक्री केंद्रावर उपलब्ध ठेवणे ही परवानाधारकाची जबाबदारी आहे़सर्वसाधारणपणे शेतकरी आपल्या शेतीमधील दैनंदिन समस्या या परवानाधारकांना सांगून त्यावर उपाययोजना करण्यासाठी रसायनाची व उत्पादनाची मागणी करतात़ याविषयी ज्याची माहिती नाही अशा रसायनांच्या शिफारशी शेतकऱ्यांना करू नये याविषयीच्या कृषी विभागाच्या स्पष्ट सूचना आहेत़ मागणी केलेल्या उत्पादनासोबत अन्य उत्पादने घेण्याबाबतचा आग्रह विक्रेत्यांनी करू नये़ अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही कृषी विभाग डोळेझाक करीत आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे़ याकडे कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे़