शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत 45,651 व्यक्तींना व्हॅक्सिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2021 05:00 IST

सुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. अनेक स्तनदा तसेच गरोदर महिला नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेत आहे.

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडून कोविडच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नमविण्यासाठी लसीकरण हा खबरदारीचा प्रभावी उपाय असल्याने जिल्ह्यात सध्या लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. त्याला वर्धेकरांचाही स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असून ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात चार दिवस लसीकरण मोहीम राबविण्यात आला. या चार दिवसांत तब्बल ४५ हजार ६५१ व्यक्तींनी कोविडची प्रतिबंधात्मक लस घेतल्याने जिल्ह्यात लसीकरण मोहिमेने ५.४७ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.  

आठवड्यात या दिवशी राबविली मोहीमशासनाकडून लसकोंडी केल्या जात असलेल्या वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ३,४,६ आणि ७ ऑगस्टला व्हॅक्सिनेशन माेहिमेला गती देण्यात आली. याच चार दिवसांत ३१ हजार १८४ व्यक्तींनी लसीचा पहिला तर १४ हजार ४६७ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे.

गरोदरसह स्तनदा महिलांना घेत आहेत व्हॅक्सिनसुरुवातीला कोविडची लस गरोदर तसेच स्तनदा महिलांना देण्याचे शासनाकडून निश्चित करण्यात आले नव्हते. तर आता शासनाकडून सूचना प्राप्त झाल्याने तसेच गरोदर तसेच स्तनदा महिलांसाठीही ही लस सुरक्षित असल्याचे पुढे आल्याने जिल्ह्यात स्तनदा व गरोदर महिलांना कोविडची प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. अनेक स्तनदा तसेच गरोदर महिला नजीकच्या लसीकरण केंद्रावर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेत आहे.

जिल्ह्यात लससाठा उपलब्ध होताच लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. आतापर्यंत लसीचे ५ लाख ४७ हजार ४८१ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले आहे. यात लसीचा पहिला डोस घेणारे ४ लाख १३ हजार १९९ तर दुसरा डोस घेणारे १ लाख ३४ हजार २२० लाभार्थी आहेत. जिल्ह्यात लसीचा वेस्ट नाहीच.- डॉ. अजय डवले, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

जंगलव्याप्त भागातही लसीकरणाला स्वयंस्फूर्त प्रतिसाद

लससाठा उपलब्ध होताच जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. विशेष म्हणजे शहरी परिसराच्या खांद्याला खांदा लावूनच जिल्ह्यातील ग्रामीण आणि जंगलव्याप्त तसेच डोंगराळ भागातील नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रांवर जाऊन कोविडची प्रतिबंधात्मक लस घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस