शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
5
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
6
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
9
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
10
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
11
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
12
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
13
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
14
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
15
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
16
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
17
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
18
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
19
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
20
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा मार्ग पूर्ववत करा

By admin | Updated: December 28, 2015 02:29 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते.

प्रवाश्यांची मागणी : भय्यापूरवासीयांची बसअभावी पायपीट
मोझरी (शेकापूर) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस ही ग्रामीण भागातील जीवनवाहिनी समजली जाते. ग्रामीण भागातील प्रवाश्यांना दळणवळणाची साधने कमी प्रणाणात उपलब्ध असल्याने बसवर अवलंबून राहावे लागते. विभागाच्या गलथानपणाचा फटका मोझरी परिसरातील प्रवाश्यांना बसत आहे. या मार्गे जाणाऱ्या बसचा मार्ग बदलल्याने प्रवाश्यांची ताटकळ होत आहे.
मोझरीकरिता वर्धा-साती, वर्धा-वरूड ही बसफेरी कानगाव, भैय्यापूर फाटा, मोझरी (शेकापूर) मार्गे धावत होती. परिसरातील प्रवाश्यांना ही बस अत्यंत सोयीची होती. परंतु गत काही दिवसांपासून या बसचा मार्ग बदलविण्यात आल्यामुळे ही बस कानगाव, डौलापूर असा बदलविण्यात आला. त्यामुळे भैय्यापूर वासीयांची फजिती होत आहे. भैय्यापूर हे गाव कानगाव, मोझरी(शे.) मार्गावर असून या स्टॉपवर प्रवाश्यासाठी प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. परंतु येथे बस येतच नसल्याने हा निवारा निरर्थक ठरत आहे. भैय्यापूर येथील प्रवाश्यांना दीड कि.मी. अंतर चालत येऊन बसथांब्यावर यावे लागते. परंतु मार्ग बदलविल्याने येथील प्रवाश्यांची गोची झाली आहे. शिवाय आर्थिक, मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवाश्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. बसच्या पूर्वीच्या मार्गात बदल केल्यामुळे भैय्यापूर येथील प्रवाश्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नसल्याने यात बराचवेळ ताटकळ होत आहे. या समस्येची दखल घेवून बसफेरीचा मार्ग पूर्ववत करण्याची मागणी वरिष्ठांकडे प्रवाश्यांनी केली असून कार्यवाहीकडे लक्ष लागले आहे.(वार्ताहर)