शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

अघोषित भारनियमनाने शेतकरी त्रस्त

By admin | Updated: August 20, 2014 23:43 IST

यंदा पावसाचे दडी मारणे शेतकरी वर्गाला खूपच महागात पदले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले विहिरीच्या पाण्याने पिकांना ओलित करीत आहे. परंतु वीज वितरणच्या अघोषित भारनियमनामुळे

घोराड : यंदा पावसाचे दडी मारणे शेतकरी वर्गाला खूपच महागात पदले आहे. त्यामुळे सिंचनाची सोय असलेले विहिरीच्या पाण्याने पिकांना ओलित करीत आहे. परंतु वीज वितरणच्या अघोषित भारनियमनामुळे ओलितास अडचणी येत असल्याने घोराड परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहे.गत आठवडा भरापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. पंधरा दिवसांपासून श्रावणसरी या भागात बसरलेल्याच नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतकरी आधीच हतबल झाले आहे. ओलीताचे साधन असलेले शेतकरी पिके जगविण्यासाठी रात्रीचा दिवस करीत असले तरी विविध कारणे समोर ठेवून महावितरणकडून अघोषित भारनियमन केल्या जात आहे. त्यामुळे पाणी असतानाही हतबल होण्याची वेळ शेतकरी वर्गावर आली आहे. ब्रेकडाऊन, इमरजसी, जम्परफाल्ट आदी शब्दाचा वापर करून लाईनमन ते अभियंता शेतकऱ्यांना समजावत आहे. मात्र रोज हे शब्द ऐकून शेतकरी आता त्रस्त झाला आहे. कर्मचारी कमी आणि रोहित्र जास्त अशी अवस्था असल्याने आता भ्रमणध्वनी उचलण्यासही टाळाटाळ केल्या जात असल्याचे दिसून येत आहे.भारनियमनाच्या वेळे व्यतिरिक्त हे भारनियमन सुरू राहत असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाच्या उद्रेकाला वीज वितरण कंपनीला समोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारा लोंबकळत आहे. त्यांच्या दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे. केळझर फीडर वरुन घोराडच्या कृषीक्षेत्रात वीजपुरवठा केला जातो. पण या रोहित्रापर्यंत सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे.(वार्ताहर)