शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

एकाच प्रशासनाचे दोन शिलेदार

By admin | Updated: May 12, 2017 00:51 IST

येथील अकरा ग्रा.पं. सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे अल्पमतात आल्याने ग्रामपंचायतीवर आयुक्तांनी प्रशासकाची नियुक्ती केली

स्पष्ट आदेशाअभावी संभ्रम : प्रशासक व सरपंच दोघांनाही अधिकार लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : येथील अकरा ग्रा.पं. सदस्यांनी राजीनामे दिल्यामुळे अल्पमतात आल्याने ग्रामपंचायतीवर आयुक्तांनी प्रशासकाची नियुक्ती केली व अकरा सदस्यांची पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात आदेश पारित केला. सदर पोटनिवडणुकीच्या आदेशाला उच्च न्यायालयात संगिता धाकतोड व उर्वरित दहा सदस्यांनी आव्हान देत याचिका दाखल करून पोटनिवडणुकीवर स्टे मिळविला. त्यामुळे सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे; परंतु प्रशासक नियुक्तीचा निर्णय कायम ठेवला. हा निर्णय देताना सरपंचाचे अधिकार कायम ठेवल्याने या ग्रामपंचायतीला दोन शिलेदार असल्याची चर्चा जोर धरत आहे. प्रशासक नियुक्त करणे म्हणजे सरपंचाचे अधिकार संपुष्टात आणणे होय; परंतु आयुक्तांनी आदेशात फक्त प्रशासकाची नियुक्ती असा उल्लेख केल्याने सरपंचाचे अधिकार संपुष्टात येतील किंवा कसे याचा स्पष्ट उल्लेख केला नाही. यामुळे सरपंचाची खुर्ची व पाटी कायम आहे. ज्या दिवशी प्रशासकाने अधिकार घेतले त्या दिवशी सरपंचाच्या पाटीवर कागद लावण्यात आला होता. मात्र नंतर तो कागद काढण्यात आला. महाराष्ट्रात असा प्रकार पहिल्यांदाच घडला असावा. जर सरपंचाचे अधिकार कायम आहेत तर मग त्यांना प्रशासनाने महाराष्ट्र दिनी झेंडावंदन का करू दिले नाही, असा प्रश्न पं.स. सदस्य प्रमोद लाडे यांनी उपस्थित केला. झेंडावंदन प्रशासक ढोणे यांनी केले होते. प्रशासकीय काळात सरपंचाच्यावतीने केले जाणारे भूमिपूजन, लोकार्पण या बाबत जि.प. सदस्य टोणपे यांनी जि.प. प्रशासनाकडे व पं.स. सदस्य लाडे यांनी पंचायत समिती प्रशासनाकडे वेगवेगळ्या तक्रारी दिल्या आहे. आयुक्तांचा आदेश असल्यामुळे मार्गदर्शन घेणार असल्याचे गट विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. पोटनिवडणुकीवर स्थगणादेश आणल्याने ग्रा.पं.मध्ये फक्त सहा सदस्य आहेत. ग्रा.पं. अल्पमतात असल्याने पाच सदस्य व सरपंचाने घेतलेले निर्णय वैद्य ठरत नाही, असा स्पष्ट उल्लेख आदेशात आहे. तरी प्रशासकाच्यावतीने त्या सहा सदस्यांनी बहुमताने घेतलेल्या ठरावाला प्राधान्य दिले जाते. अर्थात ही आयुक्तांच्या आदेशाची अवहेलना नव्हे का? याचाही खुलासा होणे गरजेचे आहे.