शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

चार अपघातांत दोघांचा मृत्यू; पाच गंभीर

By admin | Updated: May 21, 2016 02:08 IST

जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले.

सेलू, देवळी, सेवाग्राम व सेलडोह येथे अपघात वर्धा : जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या चार अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. यात सेलू, देवळी, सेवाग्राम व सेलडोह येथील घटनांचा समावेश आहे. गुरुवारी रात्री घडलेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर तिघे जखमी झाले. सेलू येथील अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर सेवाग्राम आणि देवळी येथील अपघातात प्रत्येकी एक जण जखमी झाला. नागपूर-वर्र्धा मार्गावर सेलडोह नजीक भरधाव टँकरने कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात गुरुवारी रात्री झाला. श्रीकांत शंकर बिजवार (५०) रा. गांधीनगर, वर्धा असे मृतकाचे नाव आहे. राजेंद्र काळे रा. स्टेट बँक कॉलनी, रवी वंजारे रा. केळकरवाडी व वसंत माहुरे रा. गजानन नगर वर्धा अशी जखमीची नावे आहेत. पोलीस सूत्रानुसार, नागपूरकडून वर्धेकडे जाणाऱ्या एम.एच.३२ सी. ४१८६ या कारला वर्धेकडून नागपूरकडे जाणाऱ्या एम.एच. ०६- ए.सी. ४७७६ या टँकरने जबर धडक दिली. यात कारमधील श्रीकांत बिजवार यांचा मृत्यू झाला तर कारमधील तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघात झाल्याचे निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेत जखमींना मिळेल त्या वाहनाने उपचाराकरिता सेवाग्राम रुग्णालयाकडे रवाना केले. घटनेची माहिती मिळताच सिंदी (रेल्वे) पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत मोहर्ले, पोलीस अधिकारी आकाश शाही, कर्मचारी चंद्रकांत मेघरे, निलेश सडमाके यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस कर्मचाऱ्यांनी टँकर चालकास ताब्यात घेत पंचनामा करीत अपघातग्रस्त वाहनही ताब्यात घेतले. या घटनेची सिंदी (रेल्वे) पोलिसांनी नोंद घेतली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. जखमींवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)