शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

बंद झालेली डागा मिल सुरू करा

By admin | Updated: August 10, 2015 01:48 IST

येथील डागा मिल २००९ पासून बंद करण्यात आली आहे. १८९० पासून शहराच्या मध्यभागी स्थापन झालेल्या या मिलमुळे अनेकांना रोजगार मिळाला होता.

नागरिकांचे साकडे : मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदनहिंगणघाट : येथील डागा मिल २००९ पासून बंद करण्यात आली आहे. १८९० पासून शहराच्या मध्यभागी स्थापन झालेल्या या मिलमुळे अनेकांना रोजगार मिळाला होता. यामुळे मिल पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनही पाठविण्यात आले आहे.डागा मिल पूर्वी एकदा बंद पडली होता. त्यावेळी सदर मिल पूर्ववत चालू करून नॅशनल टेक्सटाईल्स कार्पोरेशनने आपल्या ताब्यात घेतली होती. या मिलमध्ये तीन ते चार हजार कामगार काम करीत होते. मिल अत्यंत चांगल्या प्रतीचे कापड तयार करीत होती. या मिलचा कापड संपूर्ण भारत व विदेशातही जात होता. बऱ्याच नागरिकांनी आपले जीवन या मिलमध्ये नोकरी करून घालविले. हिंगणघाट ही नगरी येथील मिलमुळे कामगार नगरी म्हणूनही ओळखली जाते. ही मिल सुरू असताना बरेच व्यापारी जिनिंग शहरात स्थापन झाले. २०१० मध्ये सर्व कामगारांना स्वेच्छानिवृत्ती देऊन या मिलचे उत्पादन पूर्णत: बंद करण्यात आले; पण मिल सुरू करण्याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. सध्या मिलमध्ये २५ ते ३० कर्मचारी, सुरक्षा गार्ड व काही कामगार कार्यरत आहेत. ही मिल पूर्ववत चालू केल्यास हिंगणघाट व परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणे शक्य आहे. पाच ते सात हजार नागरिकांच्या कुटुंबाला मिलमुळे उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होऊ शकेल. आर्थिक स्थिती व बाजारपेठेवरही अनुकूल परिणाम होईल. या मिलची भरपूर जागा असून मागील बाजूस जिनिंग आहे. मिलला पूर्ण वास्तूवर लक्ष नसल्याने व काम बंद असल्याने अस्ताव्यस्त स्थिती आहे. देशात व आंतरराष्ट्रीय पातळीवर कापडाच्या उत्पादनास चांगली व व्यापक बाजारपेठ लाभली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल्स पार्कची निर्मिती राज्य व केंद्र सरकार करीत आहे. यामुळे कापूस उत्पादक, सूत व कापड विक्रीकरिता या बाबी पोषक ठरत आहे. विदर्भ कापूस उत्पादक प्रदेश आहे. या सर्व बाबी लक्षात घेत बंद अवस्थेत असलेली डागा मिल पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत श्याम इडपवार, उमेश नेवारे, प्रकाश तांबोळी, सतीश मसराम, भ्रमर रघाटाटे, किरण गहेरवार आदींनी मुख्यमंत्र्यांना निवेदन केले.(तालुका प्रतिनिधी)