शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न

By admin | Updated: June 12, 2016 01:58 IST

ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून एक वर्षापूर्वी ‘आनंदी कट्टा’ची सुरूवात करण्यात आली.

संध्या देशमुख : ‘आनंदी कट्टा’चा उपक्रमवर्धा : ज्येष्ठ नागरिकांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून एक वर्षापूर्वी ‘आनंदी कट्टा’ची सुरूवात करण्यात आली. या उपक्रमाचा वर्धापन दिन रविवारी साजरा होत आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी माहिती मातृसेवा संघाच्या मातृमंदिर येथे आयोजित पत्र परिषदेत आनंदी कट्टाच्या अध्यक्ष संध्या देशमुख यांनी दिली.ज्येष्ठांचा एकटेपणा दूर करण्यास्तव स्थापन आनंदी कट्टा या मंचाचा वर्धापन दिन रविवारी (दि.१२) सायंकाळी ६ वाजता अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे साजरा होत आहे. कार्यक्रमाला जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मीता पाटील, समाज कल्याण सहायक आयुक्त बाबा देशमुख, जि.प. समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे उपस्थित राहतील. यात अजय हेडाऊ यांचा ‘शाम ए गझल’ हा कार्यक्रम आयोजित आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक आपल्या कलागुणांचे सादरीकरण करणार असल्याचे सांगण्यात आले.आनंदी कट्ट्याच्या कलामंचावर सादर ज्येष्ठ कलाकारांना अन्य गावे, संस्था, शहरांत व्यासपीठ मिळवून देण्यासाठी कार्यक्रम घेण्यात येणार आहे. ज्येष्ठांच्या मनोरंजनासाठी विदर्भस्तरीय संमेलन घेण्यात येणार आहे. यात ज्येष्ठांचे एकत्रीकरण, विविध कलागुणांचे सादरीकरण, विविध खेळांच्या स्पर्धा आदी उपक्रम घेतले जातणार आहे. ज्येष्ठांच्या ज्ञान, गुण, उर्जेचा तसेच समृद्ध अनुभवाचा उपयोग नव्या पिढीसाठी करणे, यासाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयातून, सामाजिक सेवाभावी संस्थामधून त्यांचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. वर्षातून दोनदा हिवाळी व उन्हाळी शिबिरा विद्यार्थ्यांसाठी घेतले जातील. यात ज्येष्ठांच्या कलागुणांचा उपयोग करण्यात येणार आहे. झोपडपट्टी भागातील मुलांना विविध विषयाचे प्रशिक्षण ज्येष्ठांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. लिसनिंग सेशन अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना गाणी, थोर महान व्यक्तींच्या भाषणांच्या सी.डी. ऐकविल्या जातील. या उपक्रमांतून ज्येष्ठ नागरिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. पत्रपरिषदेला आनंदी कट्टाच्या अध्यक्ष संध्या देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, मातृसेवा संघाच्या अध्यक्ष पुष्पा देशमुख, शांता पावडे, भरत मेहता, वासुदेव गोंधळे, डॉ. भीमराव भोयर आदी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)