ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:00:59+5:30

अपघात इतका भीषण होता की अ‍ॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले.

The truck hit the truck; A serious | ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर

ट्रकची ट्रकला धडक; एक गंभीर

ठळक मुद्देनागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटातील भीषण अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : वाळू घेऊन अमरावतीच्या दिशेने जात असलेल्या ट्रकला लोखंडी अ‍ॅगल घेऊन जाणाऱ्या ट्रकने मागाहून धडक दिली. यात ट्रक चालक गंभीर जखमी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास नागपूर-अमरावती महामार्गावरील सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिर समोर झाला.
प्राप्त माहितीनुसार, एम. एच. ४० ए.के. ७७७८ क्रमांकाचा ट्रक नागपूर येथून वाळू घेऊन अमरावतीच्या दिशेने जात होता. क्षमतेपेक्षा जास्त वाळू साठा असलेला हा ट्रक नागपूर-अमरावती मार्गावरील सत्याग्रही घाटातील बाहुबली मंदिराजवळ आला असता लोखंडी अ‍ॅगल घेऊन अमरावतीच्या दिशेने जाणाऱ्या जी. जे. १० एक्स. ६८४७ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने वाळू भरलेल्या ट्रकला मागाहून जबर धडक दिली.
यात ट्रक चालक जडेजा रामदेवसिंग (३९) रा. राजकोट गुजरात हा गंभीर जखमी झाला. हा अपघात इतका भीषण होता की अ‍ॅगल घेऊन जाणाºया ट्रकमधील लोखंडी साहित्य ट्रकची कॅबीन तोडून थेट रस्त्यावर पडले. या अपघातात दोन्ही ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून जखमीला रुग्णालयाकडे रवाना केले. शिवाय दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला करून खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

वाळूमाफियांना आशीर्वाद कुणाचा?
नागपूर-अमरावती मार्गाने क्षमतेपेक्षा जास्त वाळूसाठा मालवाहूत लादून इतरांच्या जीवितास धोका होईल अशा पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात आहे. परंतु, महसूल आणि पोलीस विभागाकडून कारवाई करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वाळूची मनमर्जीने वाहतूक होत असल्याने वाळू माफियांना आशीर्वात कुणाचा अशी चर्चा घटनास्थळी होती.

Web Title: The truck hit the truck; A serious

टॅग्स :Accidentअपघात