शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हिवऱ्यात पट्टेदार वाघिणीची दहशत

By admin | Updated: May 10, 2015 01:31 IST

हिवरा येथे पट्टेदार वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे वास्तव्य असल्याच्या चर्चेने गावात चांगलीच दहशत पसरली आहे.

सेवाग्राम : हिवरा येथे पट्टेदार वाघीण आणि तिच्या दोन बछड्यांचे वास्तव्य असल्याच्या चर्चेने गावात चांगलीच दहशत पसरली आहे. या वाघिण व तिच्या दोन बछड्यांनी बकरीवर हल्ला केला़ यात एक बकरी ठार झाली, तर दुसरी जखमी झाली़ ही घटना शनिवारी सकाळी उघड झाली. याची माहिती येथील ग्रामसेवकाला देण्यात आली. त्यांनी वाघाची माहिती वनक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या माहितीवरून वनक्षेत्र अधिकारी त्यांच्या चमूसह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसर पिंजून काढला तरी त्यांना वाघाचे दर्शन झाले नाही वा पगमार्कही मिळाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. हमदापूर येथून सहा कि़मी़ अंतरावर असलेल्या हिवरा गावाजवळून बोर नदी वाहते आणि मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल आहे. याच ठिकाणी गावाला पाणी पुरवठा करणारी विहीर आहे़ शुक्रवारी सायंकाळी चंद्रकात देशमुख यांच्या बकऱ्या शेताकडे आणि विहिरीकडे असताना पट्टेदार वाघिणीने बकऱ्यांवर हल्ला केला़ ही घटना प्रत्यक्ष गौतम कोसरे यांनी पाहिली. वाघिण आणि तिच्या सोबत दोन बछड्यांना पाहून ते घाबरले़ नंतर वाघिण व बछडे विहिरीकडे निघून गेले़ शनिवारी सकाळी याच विहिरीजवळ कमलेश उईकेला वाघिण व तिच्या बछड्यांचे दर्शन झाल्याची माहिती आहे. देऊळगाव, नांद्रा व हिवरा या तीन गावांजवळून बोर नदी वाहते़ येथे झुडपांनी संपूर्ण भाग वेढून गेल्याने वाघांसाठी सुरक्षित जागा झाली आहे. जवळपास एक कि़मी़ अंतरावर शेतात मेंढ्या व बकऱ्यांचे कळप आहे़ शेतकऱ्यांच्या बकऱ्या व जनावरे नदीकाठावर चरायला व पाणी प्यायला जातात़ वाघिणीच्या दर्शनाने या भागातील तिनही गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकारामुळे नदी काठाजवळील शेतकरी मात्र कमालीचे अस्वस्थ झाल्याची माहिती हिवऱ्याचे लोमेश देशमुख, नांद्राचे सरपंच संदीप लांबट, मोहन शेगोकार यांनी दिली. (वताहर)