शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

गणेशाला यंदा बाहुबली, जय मल्हारच्या रूपाची भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2015 02:16 IST

साऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. यामुळे त्यांच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे.

प्रभाकर शहाकार पुलगावसाऱ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघे १० दिवस शिल्लक आहेत. यामुळे त्यांच्या मूर्ती बनविण्याच्या कामाला वेग आला आहे. गणेश मूर्ती बनविताना काही ना काही खास आकर्षण राहत आले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बहुचर्चित चित्रपट बाहुबली, लोकप्रिय ठरलेली टीव्ही मालिका जय मल्हार यातील व्यक्तिरेखांची भुरळ असल्याचे दिसते. अशा आकर्षक मूर्ती तयार करताना कलाकारांना पावसाचा लहरीपणा, मूर्ती बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्य, मजुरीची झालेल्या दरवाढीचा फटका सहन करावाव लागत आहे. मूर्ती बनविणाऱ्या मूर्तिकाराची सध्या धावपळ सुरू असून त्याच्या कुटुंबीयांचे हातही या कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे. पुलगावात विविध रंगरुप, वेगवेगळ्या छटांच्या जवळपास ३०० मोठ्या व १२०० लहान अशा दीड हजार मूर्तींवर अखेरचा हात फिरविणे सुरू आहे. दशकापूर्वी प्रसिद्धीत असलेल्या गणेशोत्सवात हिंगणघाट फैल भागातील कुंभारपुऱ्यात १३ ठिकाणी गणेशाच्या मूर्ती साकारण्याचे काम सुरू असून मूर्तिकार अरुण गाते यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी मूर्ती साकारत आहेत. पुलगाव कॉटन मिलच्या वैभवशाली गणेश उत्सवाची परंपरा जयभारत टेक्सटाईल्सच्या उदासीन धोरणामुळे खंडीत झाली. असे असले तरी शहरात जवळपास ४० तर ग्रामीण भागात ५०-५५ अश्या ९५ सार्वजनिक गणेश मंडळांनी या उत्सवाचे सातत्य आजही कायम आहे. शहरातील नामवंत मुर्तीकार नागोराव इंगळे यांचे पुत्र सुरेश इंगळे व वारसा हक्काने तिसऱ्या पिढीतील नातू स्वप्नील व निखिल इंगळे मूर्तिकला जोपासत आहेत. यंदा या भावंडांनी १२ फूट उंच लालबागचा राजा, १० फुटाची जय मल्हारसह जवळास ४०० मूर्ती साकारल्या आहेत. हरिराम नगरात सात जणाचे कुटुंबाचा आधार असलेला ३५ वर्षीय सुरज ठाकूर या युवा कलावंताने गेल्या दशकांत मूर्तिकलेत चांगलेच नाव कमाविले. यंदा त्याने साकारलेली १० फुटाची अश्वारुढ जय मल्हार तर १२ फुटाची लालबागचा राजासह जवळपास ६०० गणेशमूर्ती भक्ताचे लक्ष वेधून त्यांच्या जीवंत कलेची साक्ष देते.येथील मूर्तिकारकडून धामणगाव, तळेगाव, देवळी, नाचणगाव येथील सार्वजनिक गणेश मंडळांनी मूर्ती बुकींग केली आहे.