शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-दुचाकी अपघातात तिघे गंभीर

By admin | Updated: October 19, 2015 02:17 IST

नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली.

कारंजा (घाडगे): नागपूरवरून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका युवकासह दोन युवती असे तीन जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी सायंकाळी ४.३० वाजता येथील गोळीबार चौकात घडली. विलास नरेंद्र पाटील (२५), संगीता नागोराव इरपाते (१८) आणि संजीवनी प्रभाकर सातपुते (१८) तिघे रा. कारंजा अशी जखमींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना उपचारार्थ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रानुसार, व्ही. जे. १० झेड ९७५६ या ट्रकचा चालक त्याच्या ताब्यातील वाहन घेऊन नागपूरहून अमरावतीकडे जात होता. दरम्यान कारंजा येथील गोळीबार चौकातून बसस्थानकाकडे दुचाकीने नरेंद्र पाटील, संगीती इरपाते, संजीवनी सातपुते हे तिघेही जात होते. दरम्यान ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून दुचाकीला जबर धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. भरत राणा असे ट्रकचालकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या चालकाला ताब्यात घेतले असून वृत्त लिहीस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती. या प्रकरणाचा तपास कारंजा पोलीस करीत आहेत.(शहर प्रतिनिधी)भरधाव सुमो धडकलीतळेगाव (श्या.पंत.): येथील नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील सत्याग्रही घाटातील वळणावर रविवारी पहाटेच्या सुमारास भरधाव वाहनाला अपघात झाला. यात एक जण गंभीर जखमी झाला. तर अन्य किरकोळ जखमी झाले. कार्तिक भास्कर तडस (२१) रा. नंदनवन नागपूर असे जखमीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. नागपूर येथील आठ युवक अंबा देवीच्या दर्शनासाठी अमरावतीला जात होते. दरम्यान, त्यांच्या एम.एच.३६ एफ ८२०९ या वाहनाला सत्याग्रही घाटात अपघात झाला. यात वाहनाने तीन पलट्या घेतल्या. पोलिसांनी घटनेची नोंद केली असून तपास सुरू आहे. (वार्ताहर)