शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रीबाबत ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फटकारले

By admin | Updated: July 31, 2014 00:11 IST

स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू शहरासह अन्य गावांतील दारूबंदी महिला मंडळांची झालेली वाताहत व पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध वसूली यावर मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले़

सेलू : स्थानिक पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या सेलू शहरासह अन्य गावांतील दारूबंदी महिला मंडळांची झालेली वाताहत व पोलीस कर्मचाऱ्यांची अवैध वसूली यावर मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशित केले़ या वृत्तातील सर्व बाबी सत्य असल्याची खात्री होताच ठाणेदार उल्हास भूसारी यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना धारेवर धरले़ शिवाय महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही खडसावले़ ठाणेदारांनी घेतलेल्या या पावित्र्यामुळे दारूविक्रीला तात्पुरता ‘ब्रेक’ लागणार आहे; पण पुन्हा सवयीचे गुलाम असलेले हे ‘अर्थकर्म’ सुरू करतील, या शंका नाही़ यामुळे एकाच ठिकाणी राहून आपले पाळेमुळे घट्ट रोवणाऱ्या बीट जमादार व त्यांच्या अधिनस्त सहकाऱ्यांना इतर बीटचा कार्यभार देऊन पोलीस ठाण्यांतर्गत अदलाबदल करणे गरजेचे आहे. काही जुन्या व काही नवीन आलेल्या कर्मचाऱ्यांना बीटनिहाय जबाबदारी देण्याची गरज निर्माण झाली आहे. ठाणेदार उल्हास भूसारी गुन्हे शाखेत होते. यामुळे पोलिसांत राहून वर्दीखाली गैरव्यवहार करणारे त्यांना कुणी सांगण्याची गरज नाही. ठाणेदारांच्याच नावाचा गैरवापर करून भरदिवसा वसुली करणारे हे कर्मचारी ठाणेदारासाठीच धोक्याची घंटा ठरत आहे़ सेलू पोलीस ठाण्यांतर्गत बीटनिहाय जमादारावर त्या-त्या भागातील गावांची जबाबदारी आहे. एकाच जमादाराकडे अनेक वर्षांपासून हे काम असल्याने त्यांनी काही दलाल पोसले आहेत़ या दलालांच्या माध्यमातून राईचा पर्वत करून नागरिकांना त्रास द्यायचा, दमदाटी करायची व अर्थपूर्ण व्यवहार करायचा, असे समीकरण घट्ट केले़ यामुळे गुन्हेगार व अवैध व्यावसायिक वाढले असून निरपराधांना बळीचे बकरे करण्याच्या घटना वाढत आहेत़ अदखलपात्र गुन्ह्यांच्या तपास तंटामुक्तीच्या संबंधितांकडे सोपवून आपसात समेट घडविण्याचा प्रयत्न होताना दिसत नाही. अदखलपात्र गुन्ह्यांत ब्लॅकमेल करण्याचे प्रमाण सर्वाधिक होत असल्याचे दिसते़ ठाणेदार भूसारी यांच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोण सकारात्मक आहे. यामुळे त्यांनी सर्व बीटचे जमादार त्वरित कार्यमुक्त करून त्यांच्या जागेवर नव्याने आलेले व जुण्यापैकी काही चांगले चेहरे देणे गरजेचे आहे. काही वसुली करणाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांची मालगुजारी संपुष्टात आणावी, अशी मागणी सामान्यांच्यावतीने करण्यात येत आहे़ याकडे लक्ष देणे गरजेचे आहे़(तालुका प्रतिनिधी)