शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

बुटीबोरी-तुळजापूर मार्गाच्या ‘राज’मार्गात तांत्रिक विघ्न

By admin | Updated: August 20, 2014 01:00 IST

देवळी एमआयडीसीतील ७६५ के.व्ही. पॉवरग्रीडच्या लोकार्पणासह बुटीबोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अशी चर्चा असताना अचानक त्यांचा

चौपदरीकरणासाठी अभ्यास सुरू : पंतप्रधानांचा वर्धा दौरा रद्द होण्यामागे हेही कारणराजेश भोजेकर - वर्धादेवळी एमआयडीसीतील ७६५ के.व्ही. पॉवरग्रीडच्या लोकार्पणासह बुटीबोरी-तुळजापूर या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार अशी चर्चा असताना अचानक त्यांचा वर्धा दौरा रद्द झाला. वास्तविक, बुटीबोरी-तुळजापूर मार्ग हा महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) असून तो भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणकडे (एनएचएआय) देण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर होईपर्यंत चौपदरीकरणाचे भूमिपूजन दूरच असल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. बुटीबोरी ते तुळजापूर या मार्गाच्या काही भागातील बांधकाम एमएसआरडीसीमार्फत पूर्ण करण्यात आले. ही लागत वसूल करण्यासाठी या मार्गावर एमएसआरडीसीतर्फे १० पथकर नाके उभारण्यात आले. टोल वसुलीवरुन झालेल्या आंदोलनानंतर राज्य शासनाने या मार्गावरील सर्व पथकर नाके बंद केले. एकाएकी वसुली थांबल्यामुळे एमएसआरडीसीला १८२५ कोटी रुपयांचा फटका बसला. ही रक्कम राज्य शासनाने द्यावी, असा महामंडळाचा तगादा आहे. ही बाबही या मार्गाच्या राजमार्गात अडचण ठरली आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे हा मार्ग अद्याप एमएसआरडीसीकडेच आहे. या मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यासाठी एनएचएआयमार्फत अभ्यास सुरू आहे. यानंतरच प्रकल्पाला अंतिम रुप देता येणार आहे. यासाठी किमान डिसेंबर महिन्यापर्यंतचा कालावधी लागेल, अशी माहिती खुद्द एनएचएआयच्या अधिकृत सूत्राने दिली. या मार्गाला राजमार्ग करण्याची प्रक्रियाच अद्याप अपूर्णावस्थेत असताना या मार्गाच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन करणे आततायीपणाचे ठरेल. इतकेच नव्हे, तर भूमिपूजन केल्यानंतरही लगेच बांधकाम करता येणार नाही, ही गंभीर बाबही ऐनवेळी पंतप्रधानांचा वर्धा दौरा रद्द करण्यात कारणीभूत ठरली, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकृत सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.