शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

स्थायी पट्टे देण्यासाठी तातडीने कार्यवाही करा

By admin | Updated: November 20, 2014 22:57 IST

नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या.

वर्धा : नालवाडी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी स्वरुपी पट्टे देण्यात यावे, अशा सूचना आमदार डॉ. पंकज भोयर यांनी दिल्या. यासंदर्भात जिल्हाधिकारी एन. नवीन सोना व संबंधित अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भोयर यांनी त्वरीत कार्यवाही करण्याचे सांगितले.आ. भोयर यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवून त्यांच्याशी याविषयावर विस्तृत चर्चा केली. आ. भोयर यांनी संबंधितांना सांगितले की, नालवाडी सर्व्हे क्र. ५३ मध्ये आदिवासी कॉलनी असून ती शहराच्या प्रभाग २ मध्ये समाविष्ट आहे. कॉलनीत ३८२ घरांची वस्ती असून ही कॉलनी अतिक्रमण म्हणून संबोधण्यात येते. सन १९८४मध्ये १३.५ एकर जमिनीवर आदिवासी कॉलनी बेघर लोकांना दिली होती. परंतू अद्यापही येथील नागरिकांना जमिनीचे स्थायी पट्टे देण्यात आले नाही. मागील २४ वर्र्षांपासून स्थायी पट्टा मिळावा यासाठी येथील नागरिक संघर्ष करीत आहे. सन २०१२ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी एसडीओ यांना कॉलनीची मोजणी करून स्थायी पट्टे देण्याची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले होते. यावर एसडीओ यांनी मार्च २०१२ ला उपअधीक्षक भूमि अभिलेख यांना पत्र दिले. प्लॉटधारकांनी मोजणी फी एक हजार रुपये प्रति प्लॉट भरण्याचे पत्र दिले होते. यानंतर ३८२ पैकी जवळपास ३०५ नागरिकांनी मोजणी शुल्क भरले. यानंतर १० ते १३ मार्च २०१४ पर्यंत मोजणी करण्यात आली. याबाबत पुन्हा चौकशी करुन तातडीने कार्यवाही करण्याचे सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, जि.प. उपाध्यक्ष विलास कांबळे, पी. मसराम उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)