बेशिस्त जिल्हा लेखापरीक्षकांचा विषय पालकमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 05:00 AM2020-06-28T05:00:00+5:302020-06-28T05:00:28+5:30

वर्धा शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील जिल्हा विशेष लेखापरीक्षकच तीन महिन्यांपासून कार्यालयात न येत वेतन घेत असल्याची बाब काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणारी ठरत असल्याने आणि गंभीर असल्याने लोकमतनेही त्याची दखल घेत २७ जून रोजी ‘कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.

Subject of undisciplined district auditors to the Guardian Minister | बेशिस्त जिल्हा लेखापरीक्षकांचा विषय पालकमंत्र्यांकडे

बेशिस्त जिल्हा लेखापरीक्षकांचा विषय पालकमंत्र्यांकडे

googlenewsNext
ठळक मुद्देशासकीय यंत्रणेने पाठविले कात्रण। कारवाईकडे अनेकांचे लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मागील तीन महिन्यांपासून कार्यालयातून बेपत्ता असलेल्या जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ चा मनमर्जी कारभाराचा विषय शासकीय यंत्रणेने शनिवारी थेट पालकमंत्र्यांकडे पाठविला आहे. लोकमतने सदर विषय उजेडात आणल्यानंतर प्रकाशित झालेल्या वृत्ताचे कात्रण पालकमंत्री सुनील केदार यांना पाठविण्यात आल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले.
मागील तीन महिन्यांपासून महिला जिल्हा विशेष लेखापरीक्षक या कार्यालयात न आल्याने या कार्यालयातील अनेक कामे खोळंबली आहेत. शिवाय लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असताना वर्धा शहरातील जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग-१ या कार्यालयातील जिल्हा विशेष लेखापरीक्षकच तीन महिन्यांपासून कार्यालयात न येत वेतन घेत असल्याची बाब काही नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या तक्रारीतून पुढे आली आहे. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला बगल देणारी ठरत असल्याने आणि गंभीर असल्याने लोकमतनेही त्याची दखल घेत २७ जून रोजी ‘कार्यालयातून जिल्हा विशेष लेखापरीक्षक बेपत्ता’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले.
लोकमतच्या वृत्ताची दखल घेत जिल्हा शासकीय यंत्रणेने हा विषय आता थेट पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचविला आहे. पालकमंत्री सुनील केदार याविषयी काय कारवाई करतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Web Title: Subject of undisciplined district auditors to the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.