शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनायनात एसटीची वाहतूक ‘लॉक’ अन्‌ अपघात ‘डाऊन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 05:00 IST

२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. 

ठळक मुद्देअपघातग्रस्तांना महामंडळाकडून १ कोटी १ लाखांची नुकसानभरपाई

सुहास घनोकारलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या  लॉकडाऊन काळात एसटीची चाके फार मोठ्या काळापर्यंत जागीच थांबल्याने या काळात अपघाताच्या घटनांत लक्षणीय घट झाली. ही बाब दिलासादायक ठरली.२०१८ ते २०१९ या वर्षात एसटीला तब्बल ५२ अपघात झाले. यात सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०२०-२०२१ या वर्षात १६ अपघात झाले. यात दोघांना जीव गमवावा लागला. या संपूर्ण प्रकरणात एसटी महामंडळाच्या वतीने संबंधितांना १ कोटी १ लाख ८०४ रुपये नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीने गावखेड्याशी नाळ जोडली असून  एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास समजला जातो. यामुळेच ती ग्रामीण प्रवाशांकरिता आधार ठरली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू  संसर्गाने देशभरासह राज्यात आणि जिल्ह्यात थैमान घातले. यामुळे तब्बल पाच महिने एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प होती. या काळात एसटी महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. एसटी बंद राहिल्याने गावगाडादेखील जागीच रुतला होता. ऑक्टोबरअखेर एसटीची वाहतूक पूर्वपदावर आली.  मात्र, यावर्षी मार्च महिन्यापासून पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांत कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या झपाट्याने वाढू लागली. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनअंतर्गत तब्बल ४५ दिवस एसटीची वाहतूक बंद होती.  वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून एकूण २२८ बसेस आहेत. या संपूर्ण बसेसची चाके जागीच थांबली. यात त्यामुळे २०१८-२०१९ च्या तुलनेत २०२०-२०२१ मध्ये अपघातांना ब्रेक लागला. २०१८-१९ या वर्षात  ५२ अपघात झालेत. यात सहा जणांचा मृत्यू तर ७५ जण जखमी झाले. २०२०-२१ या वर्षात १६ अपघात झालेत. यात १० जण जखमी तर दोघांचा मृत्यू झाला. अपघातातील मृत, गंभीर जखमी आणि अपंगत्व आलेल्या प्रवाशांना १ कोटी १ लाख ८०४ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली. एसटीचा प्रवास सुरक्षित आणि  आर्थिक नुकसानभरपाईची हमी असल्यानेच ग्रामीण शहरीच नव्हे,  तर आता ग्रामीण भागातील प्रवासी एसटीतून प्रवासाला पसंती देत असल्याचे दिसून येते. 

असे आहेत मदतीचे निकषखासगी प्रवासी वाहनांना अपघात झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाईची कुठलीही हमी नाही. मात्र, एसटीला अपघात झाल्यास प्रवाशांना महामंडळाकडून नुकसानभरपाई दिली जाते. एसटी अपघातात मृत्यू झाल्यास प्रवाशाच्या कुटुंबीयाला १० लाख रुपये, अपंगत्व आल्यास ५ लाख, गंभीर जखमी झाल्यास १ लाख तर किरकोळ जखमी झाल्यास ५० हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते.

 

टॅग्स :state transportएसटी