शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी स्पॉट रजिस्टेशन उपयुक्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST

रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा सध्या स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी शासनाकडून अतिशय अल्प लस वर्धा जिल्ह्याला देऊन जिल्ह्याची लसकोंडीच केली जात आहे.

ठळक मुद्देसेकंड डोस घेणाऱ्यांची संख्या झाली २१ हजार

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ४५ पेक्षा जास्त वर्ष वयोगटातील सामान्य व्यक्तींना ऑनलाईन नाेंदणी तसेच स्पॉट रजिस्टेशन हे दोन पर्याय उपलब्ध करून कोविडची प्रतिबंधात्मक व्हॅक्सिन दिली जात आहे. परंतु, १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना केवळ ऑनलाईन नोंदणी करून अपॉईमेंट घेतल्यावरच लस दिली जात आहे. रविवारपर्यंत १ लाख ७३ हजार ६९ सामान्य व्यक्तींनी कोविडच्या लसीचा पहिला तर २५ हजार २५७ व्यक्तींनी व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. असे असले तरी लस घेणाऱ्यांपैकी १ लाख ५० हजार ९८ व्यक्तींनी लसीचा पहिला तर २१ हजार ९५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस थेट लसीकरण केंद्र गाठत स्पॉट रजिस्टेशन करूनच घेतल्याने स्पॉट रजिस्टेशन हा पर्याय व्हॅक्सिनेशन मोहिमेला गती देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.प्राप्त माहितीनुसार, रविवार ९ मे रोजीपर्यंत कोविडच्या लसीचे २ लाख ४१ हजार १४९ डोस लाभार्थ्यांना देण्यात आले. यापैकी लसीचा पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या १ लाख ९८ हजार ५०० आहे तर लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या ४२ हजार ६४९ असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण मोहिमेला सर्वच वयोगटातील नागरिकांचा सध्या स्वयंस्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी शासनाकडून अतिशय अल्प लस वर्धा जिल्ह्याला देऊन जिल्ह्याची लसकोंडीच केली जात आहे. सर्वच वयोगटातील लाभार्थ्यांसाठी मुबलक लस मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनातील आरोग्य विभागातील अधिकारी प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या प्रयत्नांना पाहिजे तसे यश मिळत नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. त्यामुळे या विषयात विविध राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी एकत्र येत वर्धा जिल्ह्यासाठी मुबलक लससाठा कसा मिळविता येईल यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. लस तुटवड्यामुळे सध्या १८ ते ४४ तसेच ४५ पेक्षा जास्त वयोगटातील लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देणे बंद आहे.

रविवारपर्यंत १,७३,०६९ सामान्य नागरिकांनी लसीचा पहिला तर २५ हजार २५७ व्यक्तींची लसीचा दुसरा डोस घेतला आहे. लस घेणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये स्पॉट नोंदणी करून लस घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शासनाच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबविली जात आहे.- डॉ. प्रभाकर नाईक, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस