कुणी ढिगाने तर कुणी घ्या किलोने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2020 05:00 AM2020-05-16T05:00:00+5:302020-05-16T05:00:58+5:30

वर्धा जिल्ह्यात आठ तालुके असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असे शेतकरी बारमाही पीक घेतात. यात फळ व भाजीपाल्याचा समावेश आहे. साधारत: उन्हाळ्यात लग्नसराई राहते. ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात उत्पादन हाती येईल असे नियोजन करून भाजीपाला व फळ पिकांची लागवड केली. परंतु, मार्च महिन्यात कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला.

Someone with a heap, someone with a kilo ... | कुणी ढिगाने तर कुणी घ्या किलोने...

कुणी ढिगाने तर कुणी घ्या किलोने...

Next
ठळक मुद्देलॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची फरपट : दारोदारी विक्री करताहेत फळे आणि भाजीपाला

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादीत केलेला नाशवंत शेतमाल जिल्ह्याबाहेर नेता येत नाही. शिवाय तो स्थानिक बाजारात विक्री करावा लागत आहे. इतकेच नव्हे तर व्यापाऱ्यांकडूनही अतिशय अल्प भाव दिल्या जात असल्याने उत्पादित केलेल्या शेतमालाची दारोदारी फिरून विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. उत्पादन खर्च निघावा म्हणून काही शेतकरी किलोने तर काही ढिगाने या नाशवंत शेतमालाची विक्री करीत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
वर्धा जिल्ह्यात आठ तालुके असून ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा असे शेतकरी बारमाही पीक घेतात. यात फळ व भाजीपाल्याचा समावेश आहे. साधारत: उन्हाळ्यात लग्नसराई राहते. ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकऱ्यांनी एप्रिल आणि मे महिन्यात उत्पादन हाती येईल असे नियोजन करून भाजीपाला व फळ पिकांची लागवड केली. परंतु, मार्च महिन्यात कोरोनाचा देशात शिरकाव झाला. त्यानंतर देशात लॉकडाऊन जाहीर झाला. लग्न सोहळे व धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. शिवाय जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या. ऐरवी वर्धा जिल्ह्यात उत्पादीत होणार भाजीपाला व फळ चंद्रपूर, नागपूर, अमरावती, यवतमाळ आदी जिल्ह्यात विक्रीसाठी जातो. मात्र, यंदा उत्पादीत झालेला हा नाशवंत शेतमाल शेतकऱ्यांना वर्धा जिल्ह्यातच विकावा लागत आहे. गावखेड्यांमध्ये उत्पादीत झालेल्या भाजीपाला आणि फळांना तितकी मागणी नाही. त्यामुळे मोठ्या संख्येने शेतकरी दररोज तालुका मुख्यालय व शहराच्या बाजारपेठेत येऊन आपला शेतमाल विक्री करीत आहेत. उत्पादीत फळांना ठोक व्यापारी नगाला पाच रुपये द्यायला तयार नाही. त्यामुळे अनेक शेतकरी शहरात विविध मार्गावर दुकाने थाटून व तसेच मालवाहूने ही फळ दारोदारी फिरून विक्री करीत आहेत. काही शेतकरी किलोने तर काही शेतकरी नगाने किंवा ढिगाने आपला शेतमाल दुपारी २ वाजेपर्यंत विक्री करीत आहेत. दुपारी २ नंतर संचारबंदीची प्रभावी अंमलबजाणी केली जात असल्याने शेतकऱ्यांनाही आपले सर्व सोपस्कार ठरलेल्या वेळेत पूर्ण करावे लागत आहे. हे सर्व सोपस्कार करताना तारेवरची कसरतच सध्या आम्हाला करावी लागत असल्याचे शेतकऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांवरही वाईट परिस्थिती ओढावल्याचे दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांकडूनही लुबाडणूक
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोरोनाचा वर्धा जिल्ह्यात प्रसार होऊ नये म्हणून इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात तर वर्धा जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात भाजीपाल्यासह फळांची ने-आण करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याच संधीचे सोन सध्या काही व्यापारी करीत असून त्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या या नाशवंत शेतमालाला अतिशय अल्प भाव दिल्या जात आहे. व्यापाºयांकडून राबविले जाणारे हे धोरण शेतकऱ्यांची लुबाडणूक करणारे ठरत आहे.

किलो मागे मिळतेय २ रुपये
वर्धा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कांदा पिकाचे उत्पादन घेतात. सध्या शेतकºयांचा कांदा बाजारपेठत येत आहे. असे असले तरी व्यापाºयांकडून शेतकऱ्यांच्या कांद्याला योग्य भाव दिल्या जात नसल्याने काही शेतकरी थेट जिल्ह्याचे मुख्यालय गाठून कांद्याची विक्री करीत आहेत. थेट विक्री या प्रक्रियेतून सध्या कांदा उत्पादकांना किलो मागे किमान दोन रुपये मिळत असल्याचे सांगण्यात आले.

मी यंदा पाच एकरात कांद्याची लागवड केली होती. सध्यास्थितीत १०० कट्टे (४० किलोचा कट्टा) कांदा निघाला. आणखी १०० कट्टे कांदा निघेत अशी आशा आहे. सदर शेतमालाला व्यापाºयांकडून अतिशय अल्प भाव दिल्या जात असल्याने आपण स्वत: हा माल वर्धा शहरात आणून थेट नागरिकांना विकत आहे. थेट विक्रीतून किलो मागे किमान दोन रुपये जादा भाव मिळत आहे. ४०० रुपये प्रमाणे कांद्याचा कट्टा ही सध्या विक्री करीत आहो.
- किरण खानझोडे, शेतकरी, लहान आर्वी.

सिंचनाची सुविधा असल्याने मी यंदा साडेतीन एकरात टरबुजाची लागवड केली. परंतु, तालुक्याच्या स्थळी समाधानकारक भाव मिळत नसल्याने मालवाहूत हा शेतमाल लादून मी वर्धा शहरात टरबूर विक्री करीत आहेत. टरबुजाचा आकार पाहून २०, ३०, ५० नग प्रमाणे सध्या टरबूज विक्री करीत आहो.
- अतुल चौधरी, टरबजू उत्पादक शेतकरी.

Web Title: Someone with a heap, someone with a kilo ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.