शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याचा असाही व्यवसाय

By admin | Updated: May 20, 2014 23:50 IST

लोकांची अडचण, त्यांची मानसिकता याचा फायदा घेत अनेक व्यवसाय थाटले जातात; पण येथील एका पानठेला चालकाने सुरू केलेला पाण्याचा व्यवसाय अफलातून ठरतोय़

 सेलू : लोकांची अडचण, त्यांची मानसिकता याचा फायदा घेत अनेक व्यवसाय थाटले जातात; पण येथील एका पानठेला चालकाने सुरू केलेला पाण्याचा व्यवसाय अफलातून ठरतोय़ हा व्यवसाय ग्राहकांना परवडणारा असून १५ रुपयांची तहान येथे पाच रुपयांत भागविली जात आहे़ हा प्रयोग लहान वाटत असला तरी चमत्काराच्या पलीकडचा आहे. बसस्थानकाजवळ एका पानठेला चालकाने ही शक्कल लढविली आहे़ सर्वसामान्य माणूस पाण्याच्या थंडगार बॉटलकरिता अकारण १५ ते २० रुपये खर्च करतो. सर्वसामान्य माणूस पाच रुपयांत दोन पाणी पाऊचमधील पाणी पिऊन करून तहान भागवितो़ यापेक्षा आपण थंडगार शुद्ध पाणी केवळ पाच रुपयांत देऊ शकतो, ही कल्पना त्याच्या डोक्यात आली़ ही कल्पना त्याने प्रत्यक्षात उतरवित पानठेल्यासोबत स्वस्त व शुद्ध थंड पाण्याचा व्यवसाय सुरू केला़ शुद्ध थंड पाणी स्वस्तात मिळत असल्याने पानठेल्याची आवकही वाढली. हा पानठेला चालक ३० ते ३५ रुपयांत मिळणार्‍या थंडगार पाण्याची २० लिटरची (कॅन) वाटरबॅग घेतो. पानठेल्याच्या काऊंटरवर ती ठेऊन ग्राहकाला पाच रुपयांमध्ये जवळची बाटली भरुन पिण्यासाठी देतो़ पाणी पिऊन झाल्यानंतर बाटली परत घेतो. ग्राहकाच्या समोर वाटरबॅगचा नळ सुरू करून बाटली भरून देतो. यामुळे ग्राहकांनाही शुद्ध व थंड पाणी पिऊन हायसे वाटते. अलीकडे १५ ते २० रुपयांची बाटली खरेदी न करता तहानलेले नागरिक ५ रुपयांत येथे तहाण भागवित असल्याचे दिसते़ पानठेला चालकाच्या या कल्पनेला लोक दाद देत आहेत़ नुकत्याच सुरू केलेल्या त्यांच्या या व्यवसायाला तेजी आल्याचे दिसते़ ५ रुपयांत थंड पाणी मिळत असल्याने नागरिकांनाही दिलासा मिळतोय़(तालुका प्रतिनिधी)