शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

माळेगाव (ठेका) येथे खासदारांचे श्रमदान

By admin | Updated: May 3, 2017 00:37 IST

जलसंधारणाकरिता वॉटर कप स्पर्धेत अनेक हात काम करीत आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून

‘वॉटर कप’ स्पर्धा : अधिकारी व ग्रामस्थांनी केले श्रमदान वर्धा : जलसंधारणाकरिता वॉटर कप स्पर्धेत अनेक हात काम करीत आहेत. जिल्ह्यात होत असलेल्या या कामात आपलाही हातभार लागावा म्हणून खुद्द खा. रामदास तडस यांनी श्रमदान केले. पाण्याच्या बचतीचा संदेश देण्याकरिता निवड झालेल्या आर्वी तालुक्यातील माळेगाव ठेका येथे श्रमदान करताना दिसून आले. पाण्याचा वापर वाढत आहे. पावसाचे पाणी पाहिजे त्या प्रमाणात जमिनीत मुरत नाही. यामुळे पाण्याचा वापर सांभाळून करण्याची गरज निर्माण झाली आहे. पाणी वाचविण्याकरिता सर्व शेतकरी, स्वयसेवी संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे मत यावेळी खा. रामदास तडस यांनी पाणी फाऊंडेशन तर्फे आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेत श्रमदान करताना केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणी टंचाईवर मात करण्याकरिता ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याचा निर्णय घेतला. या योजनेद्वारे २०१९ पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात टंचाईमुक्त करण्याचा केलेला निर्धार खऱ्या अर्थाने क्रांतीकारीच आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील टंचाईमुक्त होण्यास मदत होणार आहे. अभिनेते अमिर खान यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचे आयोजन केल्यामुळे प्रत्येक गावामध्ये स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाईवर मात करण्याकरिता अनेकांनी पुढाकार घेतलेला आहे. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जमिनीत मुरवीने आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामस्थांनी लोक चळवळ उभी केली आहे वाखाण्याजोगी आहे. पाणी फाऊंडेशन आयोजित ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेतील आर्वी तालुक्यातील माळेगाव ठेका येथे श्रमदान करण्याकरिता पंचायत समितीचे माजी सदस्य अमित गोमासे, अभियंता शिंगाडे, कृषी सहायक विशाल बिरे, तलाठी फुलबांधे, प्रिया बाळसराफ, अंकित जयस्वाल, मेजर ब्रह्मानंद मुन, विपीन पिसे तसेच ग्रामस्थ, स्वयंसेवी संस्थेचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.(प्रतिनिधी) अनुष्काने दिली खाऊची रक्कम नेरी (मिर्झापूर) येथील योगेश बाबाराव नागदेवते यांची मुलगी अनुष्का हिचा वाढदिवस होता. यावेळी तिने वाढदिवसानिमित्त मिळणाऱ्या खाऊची रक्कम व स्वत:कडून शक्य होईल ती रक्कम पाणी फाउंडेशनसाठी देण्याचे जाहीर केले. सोबतच वाढदिवसानिमित्त तिच्यासह कुटुंबातील सदस्यांनी श्रमदान केले. आज येथे माजी आमदार दादारावजी केचे व आर्वी पोलिसांनीही श्रमदान केले.