शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

कानगावच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: December 11, 2014 23:11 IST

बैलाचे शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस व सभेला अनुपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना गैरहजर

वर्धा : बैलाचे शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या कानगाव येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस व सभेला अनुपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांना गैरहजर राहण्याच्या कारणाचे सात दिवसांत स्पष्टीकरण देण्यासंदर्भात देण्यात आलेल्या सूचनांनी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गुरुवारी गाजली. जि.प. अध्यक्ष गैरहजर असल्याने उपाध्यक्ष विलास कांबळे यांनी सभेचे अध्यक्षपद भूषवित सभेची सूत्रे सांभाळली.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात आज सर्वसाधारण सभा आयोजित होती. या सभेला जि.प. अध्यक्ष चित्रा रणनवरे या गैरहजर राहणार असल्याचे त्यांनी पूर्वीच कळविले होते. यामुळे उपाध्यक्ष सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेला जिल्हा परिषदेचे सर्वच सदस्य उपस्थित असल्याने विविध विषयावर चर्चा घडून आली. यावेळी विविध विषयावर सूचना करण्यात आल्या.
चर्चेदरम्यान कानगाव सर्कलच्या जि.प सदस्य ज्योती देशमुख यांनी येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात होत असलेल्या अनागोंदीबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यांनी येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या मृत्यूचा प्रश्न सभागृहात मांडला. बैलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शवविच्छेदन करण्याकरिता पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील यांनी टाळाटाळ केली. यामुळे बाहेर गावातून वैद्यकीय अधिकारी बोलावून त्या बैलाचे शवविच्छेदन करावे लागले. यावर सभागृहात चर्चा करून सदर वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
याचवेळी सभेला गैरहजर राहण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यपालन अधिकारी उदय चौधरी यांनी सभाध्यक्षाकडे कुठलीही सूचना दिली नाही. नियमानुसार गैरहजर राहण्याबाबत सूचना करणे बंधनकारक आहे. या विषयावर चर्चा करून गैरहजर असलेल्या सीईओंना सात दिवसात अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देण्याबाबत सूचना करण्यात आल्यात.
सीईओंच्या गैरहजेरीबाबत सभागृहात चांगलाच वादंग उठला. यावेळी सभेचे सचिव म्हणून उपमुख्यकार्यपालन अधिकारी राजेंद्र भूयार उपस्थित होते. या दोन विषयासह सभेत सदस्यांनी विविध विषय मांडले. सभेला सर्वच विषय समित्यांचे सभापती व अधिकारी उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)