शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

आता 16 बँकांना बजावल्या जाणार कारणे दाखवा नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 05:00 IST

पीककर्ज वाटपात काही बँकांची कामगिरी समाधानकारक असली तरी सुमारे १६ बँक शाखांची कामगिरी अतिशय ढेपाळलेली असल्याने त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यात बहुतांश खासगी बँका असून ॲक्सिस बँकेचा यात  समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेने केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ठळक मुद्देपीककर्ज वाटप प्रक्रियेतील कासवगती धोरण बसले मानगुटीवर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : यंदाच्या वर्षी जिल्ह्याला खरीप हंगामात ८५० कोटींची रक्कम शेतकऱ्यांना पीककर्ज म्हणून वाटप करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु, आतापर्यंत  २२ बँकापैकी केवळ बँक ऑफ इंडिया आणि  आरआरबी/व्हीकेजीबी या दोन बँकानीच ५० टक्केच्यावर पीक कर्जाचे लक्ष पूर्ण केले आहे. तर उर्वरित बँका कासवगतीचाच अवलंब करीत असल्याने पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँकांवर कायदेशीर कार्यवाही करीत बँकांचा परवाना रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याची कठोर भूमिका जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्पष्ट केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून आता जिल्हा अग्रणी बँकेकडून पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या सुमारे १६ बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे. लेखी उत्तर मिळताच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही होणार आहे.

जिल्ह्यात २२ बँकांच्या १४१ शाखा- जिल्ह्यात खासगी व शासकीय अशा एकूण २२ बँका असून त्यांच्या शहरी व ग्रामीण भागात तब्बल १४१ शाखा आहेत. जिल्ह्याला पीककर्जाचे उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर प्रत्येक बँकेला पीककर्ज वाटपासंदर्भात उद्दिष्ट देण्यात आले आहे. पीककर्ज वाटप प्रक्रियेत काही बँकांनी चांगली कामगिरी केली आहे तर काहींनी कासवगतीचाच अवलंब केल्याने जिल्ह्याचा पीककर्ज वाटपाचा टक्का ४० वर स्थिरावल्याचे बोलले जात आहे.

खासगी बँकांचे काम ढेपाळलेलेच- पीककर्ज वाटपात काही बँकांची कामगिरी समाधानकारक असली तरी सुमारे १६ बँक शाखांची कामगिरी अतिशय ढेपाळलेली असल्याने त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. यात बहुतांश खासगी बँका असून ॲक्सिस बँकेचा यात  समावेश असल्याचे सांगण्यात आले. या बँकेने केवळ १० टक्केच पीककर्ज वाटप केल्याची नोंद अधिकाऱ्यांनी घेतली आहे.

शेतकऱ्यांनी पीककर्जाचा लाभ घ्यावा- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळीच पतपुरवठा उपलब्ध व्हावा म्हणून जिल्ह्याला यंदा पीककर्ज वाटपाचे ८५० कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. शेतकऱ्यांनीही नजीकच्या बँक शाखेत जाऊन पीककर्जासाठी आवेदन सादर करावे. कुठलीही अडचण येत असल्यास बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना भेटून शंकांचे समाधान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पीककर्ज वाटपात हयगय करणाऱ्या बँक शाखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे. बँकांनी लेखी उत्तर सादर केल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पुढील कार्यवाही करण्यात येईल.- वैभव लहाने, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक, वर्धा.

 

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाbankबँक