शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 05:00 IST

जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देरिफिलिंगसाठी दररोज करावी लागतेय तारेवरची कसरत : कोविड युनिटमधील रुग्णखाटा फुल्ल झाल्याने वाढली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : येथील जिल्हा रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या रुग्णालयातील सर्वच ऑक्सिजन बेड फुल्ल झाल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात छोटे-मोठे एकूण ९९ ऑक्सिजन सिलिंडर असून रुग्णालय प्रशासनाला रिफिलिंगसाठी दररोज तारेवरची कसरतच करावी लागत आहे.जिल्ह्यात नवीन कोविड बाधित सापडण्याची गती वाढली आहे. कोरोनाची गंभीर लक्षणे असलेल्यांना रुग्णालयांमध्ये दाखल केले जात आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेली रुग्ण संख्याच्या तुलनेत उपलब्ध आरोग्य सुविधा काही प्रमाणात तोकडी पडत आहे. प्रत्येक कोविड बाधिताला वेळीच चांगली आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोविड युनिटमध्ये तब्बल १०० ऑक्सिजन बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, सध्या हे संपूर्ण बेड फुल्ल असल्याने या रुग्णालयाची मेडिकल ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे छोटे-मोठे असे एकूण सुमारे ९९ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. याच सिलिंडमध्ये साठवणूक केलेला प्राणवायू आयसोलेशन वॉर्डच्या आवारात असलेल्या ऑक्सिजन कंट्रोल रूममधून कोविड युनिटमध्ये दाखल असलेल्या ॲक्टिव्ह कोविडबाधिताला ऑक्सिजन वाहिनीच्या माध्यमातून दिला जातो. पण उपलब्ध असलेले सर्वच सिलिंडर सध्याच्या ऑक्सिजन मागणीच्या तुलनेत अपुरे पडत असल्याने रुग्णालय प्रशासनातील अधिकाऱ्यांना रिकामे ऑक्सिजन सिलिंडर वेळीच भरून आणून कोविड बाधितांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी तारेवरची कसरतच करावी लागत आहे.

देवळी येथून होतो ऑक्सिजनचा पुरवठाजिल्हा सामान्य रुग्णालयाला देवळी येथील प्राणवायू प्रकल्पातून लिक्विड ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे.रिकामे झालेले ऑक्सिजन सिलिंडर वेळीच देवळी येथील प्रकल्पात पाठविले जात असून ते वेळीच भरून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जात आहेत. असे असले तरी किमान १०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडरची गरज जिल्हा सामान्य रुग्णालयाला हल्ली असल्याचे सांगण्यात आले.

मदतीसाठी उद्योजक अन् सामाजिक संघटना पुढे येणार काय?

कोरोना संकटाच्या काळात वर्धेकरांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रित्या ऑक्सिजन सिलिंडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यावर मात करण्यासाठी वर्धा शहरातील विविध सामाजिक संघटना, उद्योजक, व्यावसायिक पुढे येत सरळ हाताने मदत करतील काय याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे हिंगणघाट शहरात सामाजिक संघटना आणि उद्योजकांच्या पुढाकार आणि मदतीतून कोविड रुग्णालय उभे झाले आहे.

दिवसातून तीन वेळा ऑक्सिजन सिलिंडरची ने-आणतोकड्या ऑक्सिजन सिलिंडरच्या भरवश्यावर जिल्हा सामान्य रुग्णालय सध्या मोठी मजल मारत आहे. देवळी येथून जिल्हा सामान्य रुग्णालयाला ऑक्सिनचा पुरवठा होत आहे. प्रत्येक दिवशी किमान तीन वेळा रिकामे ऑक्सिजन सिलिंडर देवळी येथे नेऊन भरलेले ऑक्सिजन सिलिंडर जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनाकडे सध्या छोटे-मोठे एकूण ९९ ऑक्सिजन सिलिंडर आहेत. प्रत्येक दिवशी किमान तीन वेळा ऑक्सिजन देवळी येथून आणले जात आहे. रिकाम्या ऑक्सिजन सिलिंडरची जिल्हा सामान्य रुग्णालयाला गरज आहे.- डॉ. संगीता भीसे,                                          प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल