शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

सात वर्षीय बालकाला ट्रॅव्हल्सने चिरडले

By admin | Updated: April 17, 2016 01:56 IST

नजीकच्या धानोली (मेघे) येथील लोहकरे कुटुंब मालवाहू वाहनाने श्रीक्षेत्र आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन जात होते.

सोनेगावजवळील घटना : आजनसरा येथे स्वयंपाक घेऊन जाताना अपघात
सेलू : नजीकच्या धानोली (मेघे) येथील लोहकरे कुटुंब मालवाहू वाहनाने श्रीक्षेत्र आजनसरा येथील संत भोजाजी महाराज मंदिरात पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन जात होते. दरम्यान, सोनेगावजवळ थांबलेल्या वाहनातून उतरून रस्ता ओलांडत असलेल्या बालकाला मागाहून आलेल्या भरधाव ट्रॅव्हल्सने धडक दिली. यात बालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. ईशांत सचिन लोहकरे (७), असे मृत बालकाचे नाव आहे.
धानोली येथील सचिन लोहकरे यांनी श्रीक्षेत्र आजनसरा येथे पुरणपोळीचा स्वयंपाक ठरविला होता. तेथे जात असताना ईशांतचे आजोळ असलेल्या सोनेगाव येथून त्याच्या आजी-आजोबांना घ्यायचे होते. यासाठी वाहन थांबवून सर्व त्याच्या आजी-आजोबांना घेण्यासाठी जात होते. वाहनात बसून असलेला ईशांतही बेमालुमपणे वाहनातून उतरून रस्ता पार करीत होता. दरम्यान, मागाहून येणाऱ्या वायगाव येथील संस्कार जिनिंगमध्ये कामगार पोहोचविणाऱ्या ट्रॅव्हल्स एम.एच. ३२ क्यू. ३५९५ ने त्याला जबर धडक दिली. ट्रॅव्हल्सचे चाक त्याच्या पाठीवरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला त्वरित सेवाग्राम रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी ट्रॅव्हल्स चालक मंगेश वाल्मिक फटींग रा. वायगाव याच्यावर अल्लीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सुरू आहे.(तालुका प्रतिनिधी)

धानोली गावात शोककळा
मृतक ईशांतवर धानोली येथे दफनविधी करण्यात आला. यावेळी चिमुकल्याच्या गोंडस चेहऱ्याकडे पाहून सर्वांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली. ईशांतला दोन बहिणी असून तो आई-वडिलांचा एकुलता मुलगा होता. या घटनेमुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.