शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

व्याजाने रक्कम काढत आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा

By admin | Updated: May 14, 2017 00:46 IST

शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शेतकऱ्यांचे दु:ख मंत्रालयापर्यंत पोहोचविण्यासाठी सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील विजय जाधव यांनी त्यांचे शेत गहाण करून व्याजाने पैसे घेत दुचाकीवरून आत्महत्याग्रस्त शेतकरी अस्थिकलश दर्शनयात्रा सुरू केली आहे. शेतकरी समस्या, तसेच कर्जमुक्तीकरिता ‘कोडोली ते मुंबई’, अशी असलेली त्यांची यात्रा शनिवारी वर्धेत पोहोचली. विजय जाधव यांच्याकडे दहा गुंठे कोरडवाहू शेती आहे. त्यांची पत्नी रोजमजुरी करते. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. त्यांनाही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच दु:ख आहे. कधी त्यांच्याही मनात आत्महत्येचा विचार आला. यातून राज्यभर फिरून शक्य होईल तितक्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देत त्यांच्या अस्थि गोळा करून त्या मंत्रालयात नेण्याचे त्यांचे हे आंदोलन आहे. याकरिता त्यांचा दुचाकीने प्रवास सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने काय केले पाहिजे, हे सरकारला सांगण्यासाठी ते दुचाकीने कोल्हापूर ते मुंबई व्हाया नागपूर, असे निघाले आहेत. मुंबई येथे मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘वर्षा’ बंगला या ठिकाणी ते शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कोडोली येथील शेतकरी स्व. विलास शितापे, महादेव खोत, सांगली जिल्हा भैरू कोडलकर, चंदुबाई कोडलकर जिल्हा लातूर, वडिलांना कर्ज मिळत नाही म्हणून आत्महत्या केलेली मुलगी स्व. शीतल वायाळ व इतर अनेक जिल्ह्यांत अनेक शेतकरी आत्महत्या केलेल्या शेतकरी अस्थी रक्षा दर्शन यात्रा सुरू केली आहे. इतर जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अस्थी गोळा करीत ते आज वर्धेत पोहोचले. तत्पूर्वी, यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण ता. महागाव येथे पहिली शेतकरी आत्महत्या झालेल्या स्व. साहेबराव करपे यांच्या अस्थी कलशात घेणार आहेत. झाडगाव राळेगाव येथील आत्महत्या केलेल्या स्व. सदाशिव भोयर यांच्या अस्थी त्यांनी घेतल्या आहेत. यात वर्धेतील काही शेतकऱ्यांच्या घरी त्यांनी आज भेट देत त्यांच्या अस्थी घेतल्या. जेथे अस्थी मिळाल्या नाही, तेथील स्मशानभूमीची माती त्यांनी घेतली आहे. आत्महत्या शेतकऱ्यांच्या अस्थी घेऊन मुख्यमंत्र्यांना दर्शनासाठी घेऊन जाणार आहेत. कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार कोडोली ते मुंबई दुचाकी यात्रा : मुख्यमंत्र्यांकडे शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार