शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: हवेतच एकमेकांना धडकले अमेरिकेचे दोन फायटर जेट्स! एअर शो दरम्यान थरार; ४ पायलट चमत्कारीकरित्या बचावले
2
राजस्थान रॉयल्सची पराभवाची हॅटट्रिक; दिल्ली कॅपिटल्सच्या विजयासह प्लेऑफ्सच्या शर्यतीत नवं ट्विस्ट
3
अबुधाबीमध्ये मोठा ड्रोन हल्ला; न्यूक्लियर प्लँट नष्ट करण्याचा प्रयत्न; पुन्हा युद्धाचे ढग?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान प्रदान; ठरला ३१वा जागतिक पुरस्कार!
5
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
6
रेल्वे ठेकेदारच्या हलगर्जीपणामुळे अडकली कुत्र्यांची पिल्ले, कसारा यार्डमधील विचित्र प्रकार
7
निसर्गाचा मोठा चमत्कार! भीषण ST बस अपघातात ६ महिन्यांची गरोदर महिला सुखरूप
8
'दर्जे'दार! पुण्याच्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला 'अ' वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा
9
ना 'डील', ना ठोस आश्वासन... डोनाल्ड ट्रम्प चीनवरून रिकाम्या हाती परतले, आता पुढे काय करणार?
10
ठाणे: मिठबंदर खाडीत बेपत्ता व्यक्तीचा शोध अखेर थांबवला; चार दिवसांपासून सुरू होते शोधकार्य
11
ST बसचा कल्याण-नगर मार्गावर भीषण अपघात! चालक, प्रवाशाचा मृत्यू; २० जण जखमी
12
युक्रेनचा मॉस्कोवर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला; एका भारतीय कामगाराचा मृत्यू, ३ जखमी
13
Vaibhav Suryavanshi Record : १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी भारताचा नवा सिक्सर किंग! अभिषेक शर्माचा विक्रम मोडला
14
३० जूनपूर्वी कर्जमाफी जाहीर करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा (video)
15
PM मोदींच्या आवाहनाचा काय परिणाम झाला! किती टक्के नागरिकांनी एक वर्षं सोनं न खरेदी करण्याचा निर्णय घेतला? सर्व्हेतून मोठा खुलासा
16
RCB Qualify For IPL 2026 Playoffs : गत चॅम्पियन बंगळुरु प्लेऑफ्स गाठणारा पहिला संघ; पंजाबचा खेळ खल्लास?
17
२०५ तक्रारी, १५ कोटींची फसवणूक... देशभरातील लोकांना लुटणाऱ्या आरोपीचा पर्दाफाश
18
Video: पुणेकरांसाठी खुशखबर..! सरकारी दरात मिळणार कॅन्सर उपचार; सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू
19
सिंधू जल करारासंदर्भात भारताची आक्रमक भूमिका! हेग लवादाचा निकाल फेटाळला; आता काय करणार पाकिस्तान?
20
अन्याय सहन करणार नाही”; ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवन गौरव पुरस्कार परत केला
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शिक्षकांचा ठिय्या

By admin | Updated: April 17, 2016 02:04 IST

मराठी माध्यमांच्या शाळेबाबत शासनाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठी शाळांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे.

शिक्षक आमदार : मराठी माध्यमांच्या शाळांबाबत शासनाची भूमिका दुटप्पी
वर्धा : मराठी माध्यमांच्या शाळेबाबत शासनाची भूमिका संभ्रम निर्माण करणारी आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठी शाळांचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांना वारंवार रस्त्यावर उतरण्यास बाध्य करणे हे समर्पक नसून शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण करणारी असल्याचा आरोप शिक्षक आ. नागो गाणार यांनी केला. येथील जिल्हा परिषदेच्या आवारात शिक्षकांनी शनिवारी विविध मागण्यांकरिता ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
शैक्षणिक सत्र २०१५-१६ ची संच मान्यता वितरीत करण्याचे काम जिल्हास्तरावर सुरू आहे. त्यामध्ये पटसंख्या ९०/१०० पेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापकाचे पदच दिसून येत नाही. ही बाब एम.ई.पी.एस. १९८१ च्या नियमावली व माध्यमिक शाळा संहितेला छेद देणारी असल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद, नगर परिषदेच्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये सरसकट वर्ग ५ ते ८ जोडण्याची नियमबाह्य कृती सुरू आहे. त्यामुळे माध्यमिक शाळेबाबत शासनाची ही भूमिका अन्यायकारक असून आर.टी.ई. च्या कायद्याची भंग करणारी असल्याचा आरोप करण्यात आला. गत १५ वर्षांपासून विना अनुदानित शाळांचा प्रश्न निकाली निघाला नाही. शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या गत अनेक वर्षांपासून खितपत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या तक्रार निवारण समितीच्यावतीने विविध मागण्या करण्यात आल्या. यात आरटीई मधील तरतुदी लक्षात घेता प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेत सरसकट चवथीच्या शाळांना पाचवा वर्ग व सातवीच्या शाळांना आठवा वर्ग सर्व ठिकाणी जोडण्यात येत आहे. या कृतीवर आळा घालण्याची मागणी करण्यात आली. पात्र विना अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतन सुरू करणे व अपात्र शाळांना तात्काळ पात्र घोषित करण्याची मागणीही करण्यात आली.
१ नोव्हेबर २००५ रोजी विना अनुदानित/अशंत: अनुदानित शाळेत नियुक्त सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. नियुक्त सर्व शिक्षण सेवकांना सेवा संरक्षण देवून वैयक्तिक मान्यता देण्याबाबत शिबिराचे आयोजन करणे, आश्रम शाळेतील अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन होईपर्यंत काम नाही, वेतन नाही या संदर्भातला सामाजिक न्याय विभागाचा आदेश रद्द करण्यात यावा.
यासह शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्या तातडीने निकाली काढणे. जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकाऱ्यांची पदे तातडीने भरणे आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.(प्रतिनिधी)