भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 05:00 IST2020-07-18T05:00:00+5:302020-07-18T05:00:23+5:30

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पढेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भदाडी नदीला दोन-तीन मोठे पूर आलेत. पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राकडून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळली व पुरात वाहून गेली. यासंदर्भात सरपंच अनंता हटवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाघमारे यांनी पाहणी केली.

The safety wall of the bridge over the Bhadadi river was carried away | भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून

भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत गेली वाहून

ठळक मुद्देपढेगावातील घटना : बांधकाम विभागाकडून पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : पढेगाव येथील भदाडी नदीवरील पुलाची सुरक्षा भिंत वाहत गेल्याने पुलाला धोका निर्माण झाला आहे. याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाहणी करण्यात आली.
जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पढेगावसह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे भदाडी नदीला दोन-तीन मोठे पूर आलेत. पुराच्या पाण्यामुळे नदीच्या पात्राकडून बांधण्यात आलेली सुरक्षा भिंत कोसळली व पुरात वाहून गेली. यासंदर्भात सरपंच अनंता हटवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता वाघमारे यांनी पाहणी केली. ग्रामस्थांनी सुरक्षा भिंतीचे तातडीने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी केली.

Web Title: The safety wall of the bridge over the Bhadadi river was carried away