शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

चक्क एप्रिल महिन्यात नदी वाहतेय ओसंडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 05:00 IST

कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक होत होत्या. परिणामी, गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या उद्भवत होती.

ठळक मुद्देचिकणी, पढेगाव शिवारातील जलसाठा वाढला : जानेवारीतच कोरडेठाक व्हायचे नदीपात्र

लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : चिकणी, जामणी, पढेगाव शिवारातील भदाडी नदी एप्रिल महिन्यातही ओसंडून वाहत आहे. दोन वर्षांपूर्वी हीच नदी जानेवारी महिन्यातच मृतावस्थेत येत होती. आता मात्र ओसंडून वाहत असून जलसाठ्यातही कमालीची वाढ झाली आहे.वायफड नजीकच्या लोणसावळी टेकडीमधून उगम असलेली भदाडी नदी वायफड, दहेगाव, जामणी, चिकणी, पढेगाव, सेलसुरा असा मार्गक्रमण करून सरूळजवळ यशोदा नदीत विलीन झाली. ४०-५० वर्षांपूर्वी ही नदी एप्रिल महिन्यातसुद्धा वाहायची, असे वयोवृद्ध सांगतात.कालांतराने पर्जन्यमान कमी होत गेल्यामुळे भदाडी नदीचे जलपात्र जानेवारी महिन्यातच कोरडे व्हायला सुरुवात होत होत. मार्च, एप्रिल महिन्यात तर एक थेंबही पाणी राहात नव्हते. यामुळे शेतातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत घट होत होती. तर काही विहिरी कोरड्याठाक होत होत्या. परिणामी, गुरांच्या पिण्याच्या पाण्याचीही गंभीर समस्या उद्भवत होती.दोन वर्षांपूवीर जलयुक्त शिवारअंतर्गत जमनलाल बजाज फाऊंडेशनच्या वतीने भदाडी नदीसह नाल्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व सरळीकरण करण्यात आले. काही अंतराच्या फरकाने खड्डे करण्यात आलेत आणि गावाच्या आसपास बंधारे सुध्दा बांधण्यात आले. यामुळे नदीपात्राच्या जलसाठ्यात वाढ झाली व एप्रिल महिन्यात सुध्दा नदी पात्रात पाण्याची वाहती धार पाहावयास मिळते. यामुळे शेतकऱ्यांसह गोपालकांना दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :riverनदीWaterपाणी