शहरं
Join us  
Trending Stories
1
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
4
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
5
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
6
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
7
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
8
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
9
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
10
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
11
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
12
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
13
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
14
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
15
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
16
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
17
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
18
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
19
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
20
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ उमेदवारांच्या समस्या निकाली काढा

By admin | Updated: May 7, 2017 00:42 IST

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनी मधील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.

तांत्रिक अ‍ॅप्रेंटिस असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : महावितरण, महापारेषण, महानिर्मिती कंपनी मधील शिकाऊ उमेदवार व कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या निकाली काढण्यात याव्या, अशी मागणी तांत्रिक अप्रेंटीस असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनातून, महानिर्मिती कंपनीत शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थ्यांकरिता १० टक्के पदे राखीव राहत असून त्या जागा ८० टक्के इतक्या करण्यात याव्या. ग्रॅज्युऐट अ‍ॅप्रेंटीसांना आरक्षण देण्यात यावे. शासनाच्या निर्णयाप्रमाणे सेवा योजना जाहिरातीतील ई. एस. बी. सी. उमेदवारांची निवड यादी लावण्यात यावी. महावितरण कंपनीत तृतीय व चतुर्थ श्रेणी सवर्गातील हजारो पदे रिक्त असून ते तात्काळ भरण्यात यावे. ‘ग्राम विद्युत व्यवस्थापक’ या पदाकरिता अनुभवी असलेल्या कंत्राटी कामगार व शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देत त्यांना किमान वेतनाच्या आधारे वेतन देण्यात यावे. उपकेंद्र सहायक ईलेक्ट्रीशियन आय. टी. आय. धारकांना एक वर्षाची शिकाऊ उमेदवारी हेच अनुभव ग्राह्य धरण्यात यावे. शासनाने सरळ सेवा भरतीकरिता वयोमर्यादेत वाढ केली असून त्यानुसार महापारेषण व महानिर्मिती कंपनीने याबाबत कार्यवाही करावी. महावितरण कंपनीमध्ये कार्यरत कंत्राटी कामगारांना कायम सेवेत सामावून घेण्यात यावे. त्याचप्रमाणे त्यांच्याकरिता सरळ सेवा भरतीमध्ये जागा आरक्षित ठेवण्यात याव्या. महावितरण कंपनीतील कार्यरत असलेल्या कुशल, अर्धकुशल, अकुशल कामगारांना शासन परिपत्रकानूसार किमान मुळ वेतनात वाढ करण्यात यावी यासह आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी स्विकारले. याप्रसंगी तांत्रिक अ‍ॅप्रेंटीस असो.चे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, रोशन देशमुख, नितीन लांडगे, राजू जाधव, दिलीप तडस, सुमीत बिहारी, गुलाब कुरटकर, विपीन झोरे, प्रतीक सुरकार, मिलिंद वंजारी, शुभम बाळोले, मनोज सुपारे, दिनेश परचाके, दीपक ताजने, राजू कोचे, हर्षल रामटेके, इंद्रजित राठोड आदींची उपस्थिती होती.