रविशंकर शर्मा यांचे निधन

By Admin | Updated: May 10, 2017 02:13 IST2017-05-10T02:13:59+5:302017-05-10T02:13:59+5:30

महारोगी सेवा समिती, मनोहरधाम, दत्तपूरचे माजी विश्वस्त सचिव डॉ. रविशंकर शर्मा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

Ravi Shankar Sharma's demise | रविशंकर शर्मा यांचे निधन

रविशंकर शर्मा यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महारोगी सेवा समिती, मनोहरधाम, दत्तपूरचे माजी विश्वस्त सचिव डॉ. रविशंकर शर्मा यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगा व तीन मुली असा मोठा आप्त परिवार आहे.
आचार्य विनोबा भावे यांच्या आग्रहावरून जयप्रकाश नारायण यांनी डॉ. शर्मा यांना दत्तपूर येथील महारोगी सेवा समितीच्या कार्यास्तव पाठविले होते. पद्मश्री मनोहर दिवाण यांच्यासह त्यांनी कुष्ठरुग्णांची सेवा केली ती जीवनाच्या अखेरपर्यंत. महाराष्ट्र शासनाने डॉ. शर्मा यांना दलितमित्र पुरस्कार देऊन गौरविले. उद्या (बुधवारी) सकाळी ७ वाजता आलोडी येथील निवासस्थानावरून त्यांची अंत्ययात्रा निघेल. परमधाम आश्रम, पवनार येथे अंत्येष्टी होईल, असे कळविण्यात आले आहे.

Web Title: Ravi Shankar Sharma's demise