शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

डाळीचे भाव गगनाला

By admin | Updated: April 25, 2016 01:59 IST

मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचे उत्पन्न समाधानकारक असले तरी डाळीचे भाव मात्र गगनाला भिडले आहे.

महागाईचा फटका : तूर डाळीचे वरण ताटातून हद्दपारवर्धा : मागील वर्षीच्या तुलनेत तुरीचे उत्पन्न समाधानकारक असले तरी डाळीचे भाव मात्र गगनाला भिडले आहे. यंदा तूर डाळीचे भाव प्रतिकिलो १५० ते १८० रुपये आहे. यामुळे वाढत्या उन्हाच्या पाऱ्यासोबत सर्वसामान्यांना या भाववाढीचे चटके सोसावे लागत आहे. यामुळे ताटातून वरण हद्दपार होईल, काय अशी शक्यता वर्तविली जात आहे.तुरीच्या डाळीसह सर्वच डाळीच्या दरात वाढ झाली आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन समाधानकारक झाल्याने डाळीचे भाव कमी राहतील, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. नवीन तूर निघताच डाळीचे भाव १०० ते १२० रूपये प्रतिकिलो होते. मात्र काही दिवसात तूर डाळीचे भाव वाढले आहे. किरकोळ बाजारपेठेत तूर डाळ १५० ते १७० रूपये किलो आहे. यावर्षी महागाईच्या भडक्यात सर्वसामान्य नागरिक होरपळणार असल्याची स्थिती आहे. डाळीच्या वाढत्या दराने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तूर डाळीला पर्याय ठरणाऱ्या चना डाळीचे दरही दुप्पट झाल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातून वरण हद्दपार होणार असल्याचे दिसून येत आहे. यासह सर्व डाळीचे भाव वाढतच असल्याने स्वयंपाक घरातून डाळी बाद होण्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हाच्या झळात भाज्यांचे दरही भडकले आहेत. त्यामुळे खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वरण-भातावर समाधान माणणाऱ्या गरिबांच्या ताटातील एक एक पदार्थ कमी होऊ लागला आहे. एकंदरीत उन्हाच्या झळात वाढत्या महागाईने सर्वसामान्य पुरते होरपळून निघत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)