ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 06:00 AM2020-02-24T06:00:00+5:302020-02-24T06:00:34+5:30

पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत; पण त्यानंतर शासनाने काढलेला स्थगनादेश आदेश या कामांना थांबा देणारा ठरत आहे.

Postponement of approved work in rural areas will be raised | ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार

ग्रामीण भागातील मंजूर कामांवरील स्थगिती उठणार

Next
ठळक मुद्देपंकज भोयर : उपमुख्यमंत्र्यांशी केली सकारात्मक चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी काही महत्त्वाची कामे मंजूर करण्यात आली. नंतर याच कामांना काही कारणास्तव सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. ही कामे कशी महत्त्वपूर्ण आहे, शिवाय या विकासकामांवरील स्थगिती उठविल्यास जनतेच्या समस्या निकाली निघेल, हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट घेऊन आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पटवून दिले. या विषयावर पालकमंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली.
सेवाग्राम या गावातून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्याला दिशा दिली. तर पवनार येथून आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळीला दिशा दिली आहे. ग्रामीण भागाचा विकास या उद्देशाने लेखाशीर्ष २५१५ ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा योजनेंतर्गत काही ठळक कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यांना ग्रामविकास विभागाकडून मंजुरीही प्रदान करण्यात आली आहे. काही कामे प्रगतिपथावर आहेत; पण त्यानंतर शासनाने काढलेला स्थगनादेश आदेश या कामांना थांबा देणारा ठरत आहे. सुमारे १० कोटींची ही कामे असून या कामांवरील स्थगिती हटवून वर्धा विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी भोयर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली.

Web Title: Postponement of approved work in rural areas will be raised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.