शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाने पादचाऱ्यास चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST

अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे (३५), रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

ठळक मुद्देपोलिसात गुन्हा नोंद, आरोपी अटक : कार चालविली निष्काळजीपणे

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहर पोलीस ठाणे येथे पोलीस शिपाई असलेल्या सचिन दुर्गाप्रसाद दीक्षित (वय ३०), रा. रामनगर याने आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या पादचाऱ्यास धडक दिली. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालयासमोर घडली. रौनक सुबोध सबाणे (३५), रा. सबाने लेआऊट, असे मृताचे नाव आहे.शुक्रवारी पहाटे रौनक सुबोध सबाणे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. ते पायी-पायी बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालयाजवळ असले असता भरधाव असलेल्या एमएच ०६ बीई ४७११ क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. अपघात होताच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर चढले. अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे (३५), रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

घटनास्थळी जमली होती बघ्यांची एकच गर्दीबॅचलर रोडवर झालेल्या अपघाताची वार्ता वर्धा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांची गर्दी बाजूला सारून सुरूवातीला पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेली. अपघातग्रस्त वाहन आरोपीच्याच मालकीचे की दुसऱ्या कुणाच्या मालकीचे यासह विविध बाबांचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे.  

 

टॅग्स :AccidentअपघातPoliceपोलिस