शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांवर कारवाईसाठी बंदूकधारी पोलीस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करीत आहेत.

ठळक मुद्देराजपत्रित अधिकाऱ्यांची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाळूमाफियांकडून उस्मानाबाद जिल्ह्यात तहसीलदारांवर भ्याड हल्ला करण्यात आला. या घटनेचा निषेध करीत वाळूमाफियांवर कारवाई करताना बंदूकधारी पोलीस अधिकारी व कर्मचारी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना देण्यात यावे, अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे.अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडतो. शिवाय अवैध उत्खनन माफियांवर कारवाई करण्याची जबाबदारी महसूल विभागाकडे सोपण्यात आली आहे. सध्या स्थितीत उत्खनन माफियांकडून विनापरवाना बंदूक बाळगली जात आहे. इतक्यावर ते थांबत नसून कारवाईसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांवर हल्ला करीत आहेत. त्यामुळे कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.अवैध उत्पनन करणाऱ्यांर कारवाई करणाऱ्या महसूल विभागाच्या चमूला बंदूकधारी पोलीस अधिकारी व काही पोलीस कर्मचारी तातडीने देण्यात यावे. जोपर्यंत सदर मागणी पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत अवैध गौण खनिज उत्खनन व वाहन प्रतिबंधात्मक कारवाईत महसूल विभागाचा कोणताही अधिकारी सहभागी होणार नाही, असा स्पष्ट इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. सदर निवेदन प्रभारी जिल्हाधिकारी अशोक लटारे यांनी स्विकारले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे कार्याध्यक्ष तथा वर्धेचे उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार प्रीती डुडुलकर, नायब तहसीलदार शकुंतला पाराजे, स्वप्नील दिगलवार, वनकर आदींची उपस्थिती होती.रात्रीलाही करावी लागते कारवाईवाळूसह उत्खनन माफियांकडून काळोखाचा फायदा घेत अवैध उत्खनन केले जाते. शिवाय, उत्खनन केलेल्या गौणखनिजाची काळोखातच विल्हेवाट लावली जाते. अशावेळी जीव मुठीत घेऊनच अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारवाई करावी लागते.

टॅग्स :sandवाळू