शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक वॉर्डात पाच वृक्षांचे रोपण करणार

By admin | Updated: May 1, 2016 02:09 IST

‘नो व्हेईकल डे’ निमित्त शनिवारी सकाळी जनजागृती करण्यात आली. न.प. च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रदूषणमुक्त समाजाबाबत शपथ देण्यात आली.

रामदास तडस : ‘नो व्हेईकल डे’निमित्त सायकल रॅलीद्वारे जनजागृतीदेवळी : ‘नो व्हेईकल डे’ निमित्त शनिवारी सकाळी जनजागृती करण्यात आली. न.प. च्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात प्रदूषणमुक्त समाजाबाबत शपथ देण्यात आली. शिवाय वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्षस्थानी खासदार रामदास तडस तर अतिथी म्हणून डॉ. श्रावण साखरकर, प्रा. पंकज चोरे, प्रा. नितीन आचार्य, कराटे प्रशिक्षक अनुप कपूर, महालक्ष्मी टीएमटीचे प्रकाश दुधकोहळे उपस्थित होते.तत्पूर्वी खा. तडस यांच्या मार्गदर्शनात सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीत शोतोकान कराटे असोसिएशनचे कराटेपटू, महालक्ष्मी टीएमटीचे कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ‘नो व्हेईकल डे’च्या उपक्रमाला अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त करीत खा. तडस यांनी येत्या १४ मे पासूनच्या प्रत्येक शनिवारी शहरातील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात येईल. प्रत्येक वार्डातील दहा गुणवंत विद्यार्थ्यांना ‘लोकमत’चे स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले जाईल. प्रत्येक वार्डात वृक्ष कठड्यांसह पाच झाडे लावून प्रदूषण मुक्तीचा संदेश देण्यात येईल, असे सांगितले. प्रास्ताविक हरीदास ढोक यांनी केले. सायकल रॅलीसह कार्यक्रमाला न.प.चे आनंद सांडे, सुरेंद्र राठोड, करण तांबुळकर, अर्जुन पवार, विरेंद्र राठोड, दीपक गोडबोले, समीर शाहु, सौरभ लाडेकर, साक्षी कांबळे, आकांक्षा बेंदले, स्वाती कांबळे, दीक्षा चिचघाटे, सिमरन वावरे, प्रभाकर वऱ्हाडे, सचिन कांबळे, सुदर्शन शंभरकर, आदमने आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)