शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

तूर घसरली, चणा चढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून

सप्टेंबर अखेरीस तूर सरासरी ६,७४० तर चण्याच्या भावात ८,५०० रुपयांपर्यंत वाढरूपेश खैरी वर्धाशेतकऱ्यांना यंदाच्या हंगामातही गत हंगामाप्रमाणे तुरीचे दर वाढतील अशी अपेक्षा होती; मात्र बाजारात तुरीचे दर दिवसागणिक पडत असून त्या तुलनेत चण्याचे दर चढत असल्याचे दिसत आहे. आज कधी नव्हे तेवढे चण्याचे दर चढले आहे. चणा सरसरी ८ हजार ५०० रुपयांवर गेला आहे. यामुळे यंदाच्या हंगामात चण्याचा पेरा करणाऱ्यांना चांगलाच लाभ झाल्याचे दिसत आहे. गत हंगामात तूर १३ हजार रुपयांवर पोहोचली होती. यंदा मात्र सप्टेंबर महिन्यात तूर ७ हजार रुपयांवरच आहे. सध्या असलेले दर वाढतीलच असे संकेतही बाजारात नाही. गत सहा महिन्यात तुरीच्या दरांचा विचार केल्यास ते पडतच असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धा बाजार समितीत ८ हजार ६०० रुपयांनी खरेदी झालेली तूर आज सात हजार रुपयांवर आली आहे. हिच अवस्था जिल्ह्यातील मोठी बाजार समिती म्हणून नाव असलेल्या हिंगणघाट समितीची आहे. येथे ७ हजार ६९० रुपयांपासून सुरू झालेली खरेदी आज ७ हजार २५ रुपयांवर आली आहे. तुरीच्या तुलनेत महिन्याकाठी मात्र चन्याच्या दरात वाढच होत असल्याचे दिसत आहे. मार्च महिन्यात ४ हजार ६०० रुपयांपासून खरेदी सुरू झालेला चना आज वाढत जावून ८ हजार ५५० रुपयांवर स्थिरावला आहे. हिच स्थिती हिंगणघाट बाजार समितीची आहे. यंदा ज्या शेतकऱ्यांकडे चणा होता त्यांनी हंगाम साधल्याच्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. गत वर्षी तुरीच्या वाढीव दराचा शेतकऱ्यांना लाभ होता. यंदा तो लाभ चण्याचे उत्पन्न घेण्याऱ्या शेतकऱ्यांना झाला आहे. असे असले तरी जिल्ह्यात तुरीच्या तुलनेत चण्याचे पीक घेणारे शेतकरी कमी असल्याने वाढीव भावाचा जिल्ह्याला विशेष लाभ झाला नसल्याचे बोलले जात आहे. वर्धा बाजार समितीचा विचार केल्यास गत सहा महिन्यात एकूण १६ हजार १५० क्विंटल चण्याची आवक झाली आहे तर तुरीची २१ हजार १२७ क्विंटल झाली आहे. गरजू नाही तर साठेबाज शेतकऱ्यांनाच दरवाढीचा लाभगत सहा महिन्यांपासून चन्याचे दर वाढतच आहे. याचा ल् ााभ गरजवंत शेतकऱ्यांना होण्याऐवजी साठेबाज शेतकऱ्यांनाच होणार असल्याचे दिसून आले आहे. रबीत घेतलेला चना विकून शेतकऱ्यांनी नवा खरीप साजरा केला. यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडील चना ४ हजार ५०० ते ५ हजार रुपयांत विकल्या गेला. आज शेतकऱ्यांकडे चना नसताना बाजारात ८ हजार ५०० रुपये दर आहे. याचा लाभ शेतकऱ्यांन नाही तर साठेबाज शेतकरी आणि व्यापाऱ्यांना होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या घरी तुरी पडून गत हंगामात तुरीचे दर वाढले होते. यंदाही तुरीचे दर वाढतील असा अंदाज शेतकऱ्यांना होता. यामुळे काही सधन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे तुरीचा साठा करून ठेवला होता. दर वाढताच तूर विकण्याचा त्यांचा मानस होता. मात्र यंदाच्या हंगामात तुरीचे दर वाढण्याऐवजी ते घसरत असल्याचे दिसून आले आहे. मार्च महिन्यात वर्धेत ८ हजार ६०० तर हिंगणघाट बाजार समीतीत ७ हजार ६९० रुपये असलेले दर सप्टेंबर अखेर वर्धा बाजार समितीत ६ हजार ७४० तर हिंगणघाट येथे ६ हजार ३८३ रुपयांचवर गडगडले आहे. येत्या महिन्यात दिवाळसण आहे. या काळात शेतकऱ्यांचे सोयाबीन निघते. त्या काळात सोयाबीनला दर मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मात्र ती दर वर्षीच फोल ठरत आली आहे. यंदाही तसेच होण्याची शक्यता आहे.