श्री मुनी सुव्रतनाथ विधानासाठी राज्यातून जैन श्रावकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2020 06:00 AM2020-01-26T06:00:00+5:302020-01-26T06:00:34+5:30

विधान महोत्सवासाठी जैन श्रावक, श्राविका, उपासिका यांची मोठी गर्दी उसळली असून राज्याच्या काना- कोपºयातून तेसच प्रदेशाच्या पांढुरणा, प्रभात पट्टण, मुलताई, आमला बैतुल, चिंचोली, भेसदेही या भागातून जैन श्रावकांनी आपली उपस्थिती लावली आहे. विधान महोत्सवात प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता आचार्य श्री राष्ट्रभक्तीपर विशेष प्रवचन करणार असून जिनालयाच्या शिलान्यासासाठी जवळपास २५ फूट उंच कुर्मशिला सकाळी ११ वाजता उभारल्या जाणार आहे.

Participation of Jain listeners from across the state for the statement of Shri Muni Subratanath | श्री मुनी सुव्रतनाथ विधानासाठी राज्यातून जैन श्रावकांचा सहभाग

श्री मुनी सुव्रतनाथ विधानासाठी राज्यातून जैन श्रावकांचा सहभाग

Next
ठळक मुद्देप्रजासत्ताकदिनी आचार्य सुवीर साक्षरजी महाराज करणार प्रबोधन

लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : जैनधर्माचे २० वे तीर्थकर भगवान श्री मुनी सव्रतनाथ यांचे जिनालय पुलगावात साईधाम परिसरासमोरील मैदानात साकरल्या जाणार आहे. जैन मंदिर ट्रस्टच्यावतीने विधान महोत्सवात २५ रोजी दुसऱ्या दिवशी अभिषेक, नित्य पूजन, आहार चर्चा, गुरुभक्ती, मंगलवाद्य आदींसह मुनी सुव्रतनाथ विधान या महापुजेचे आयोजन मांगलिक वातावरणात पार पडले.
विधान महोत्सवासाठी जैन श्रावक, श्राविका, उपासिका यांची मोठी गर्दी उसळली असून राज्याच्या काना- कोपºयातून तेसच प्रदेशाच्या पांढुरणा, प्रभात पट्टण, मुलताई, आमला बैतुल, चिंचोली, भेसदेही या भागातून जैन श्रावकांनी आपली उपस्थिती लावली आहे. विधान महोत्सवात प्रजासत्ताक दिनी सकाळी ९ वाजता आचार्य श्री राष्ट्रभक्तीपर विशेष प्रवचन करणार असून जिनालयाच्या शिलान्यासासाठी जवळपास २५ फूट उंच कुर्मशिला सकाळी ११ वाजता उभारल्या जाणार आहे. सौधर्म इंद्र कुबेर इंद्र विधान नायक व श्रेष्ठ इंद्र यासह २१ इंद्र इंद्राणींनी सकाळी जिनेंद्राभिषेक केला तर सुलू विजय चानेकर व अंकुश जीतेंद्र सोईतकर यांच्याहस्ते भगवान पार्श्वनाथ प्रभुंच्या प्रतिमेवर अभिषेक करण्यात आला. दुपारी १२ ते ५ पर्यंत पूजा विधान सायंकाळी आनंद यात्रा, गुरुभक्ती, आरती करण्यात आली. सायंकाळच्या सांस्कृतिक संध्या कार्यक्रमात २१ इंद्र, इंद्राणीसह आयोजिलेला इंद्र दरबार जैन समाज बांधवांना मोहित करुन गेला. या महोत्सवाचे प्रतिष्ठाचार्य पंडित संजय ‘सरस’ व संगीत संचातून भक्तीधारा प्रवाहित करणारे पं. संदीप दौड उपस्थितांना मंगल सुमधूर सुरांची मेजवानी देत आहे. या त्रिदिवसीय विधानासाठी ट्रस्टचे विश्वस्त सागर बदनोरे, किशोर बदनोरे, पंकज पोहरे, निखील बदनोरे, अमित बदनोरे, रोहन बदनोरे, विवेक सावळकर, राहुल काळे, जय गुलालकर, पुनम धोपाडे, संगीता शहाकार, सारिका पोहरे, पल्लवी बदनोरे, दिपीका बदनोरे, पुजा हणमंते, स्रेहा पोहरे यांचेसह जैन बंधु भगिनींचे सहकार्य लाभत आहे.

Web Title: Participation of Jain listeners from across the state for the statement of Shri Muni Subratanath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.