ओरिएंटल टोल नाक्यात सव्वा कोटींचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:25+5:30

टोल वसुलीतून २०१७ पासून आतापर्यंत टोल नाक्याचे सहायक लेखा व्यवस्थापक विजया रामाराव कोंडामरू (४१) रा. कवाली नेल्लोर (आंध्रप्रदेश) व सहायक उपव्यवस्थापक हर्षित टिपूलाल अग्रवाल (४०) रा. व्यंकटेश सिटी, बुटीबोरी या दोघांनी मिळून १ कोटी २४ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केला.

Oriental toll hits hundreds of crores in the nose | ओरिएंटल टोल नाक्यात सव्वा कोटींचा अपहार

ओरिएंटल टोल नाक्यात सव्वा कोटींचा अपहार

Next
ठळक मुद्देगुन्हा दाखल : सहायक व्यवस्थापकांनीच लावला चूना

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नागपूर ते अमरावती महामार्गावरील कांरजा (घा.) नजिकच्या ओरिएंटल पथवेज प्रा. लिमिटेडच्या टोल नाक्यावर सहायक लेखा व्यवस्थापक व सहायक उपव्यवस्थापकांनी तब्बल १ कोटी २४ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केल्याची माहिती तक्रारीअंती पुढे आली आहे. याप्रकरणी ओरिएंटलचे महाव्यवस्थापक प्रशांत बर्गी रा. नागपूर यांनी कारंजा पोलिसात तक्रार नोंदविली आहे.
कारंजा (घा) येथे ओरिएंटल पथवेज टोल नाका असून या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असते. दररोज लाखो रुपयाचा टोल वसूल केल्या जातो. याच टोल वसुलीतून २०१७ पासून आतापर्यंत टोल नाक्याचे सहायक लेखा व्यवस्थापक विजया रामाराव कोंडामरू (४१) रा. कवाली नेल्लोर (आंध्रप्रदेश) व सहायक उपव्यवस्थापक हर्षित टिपूलाल अग्रवाल (४०) रा. व्यंकटेश सिटी, बुटीबोरी या दोघांनी मिळून १ कोटी २४ लाख ८० हजार रुपयाचा अपहार केला. याप्रक रणी या दोघांनी अपहार केल्याची कंपनीला कबुलीही दिली. तसेच ही रक्कम कंपनीला परत करण्याची लेखी हमीही दिली होती. परंतु, कंपनीला रक्कम परत केली नसल्याने ओरिएंटलचे महाव्यवस्थापक बर्गी यांनी कारंजा पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे. हे दोन्ही आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Web Title: Oriental toll hits hundreds of crores in the nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.