न्यायालयाच्या आदेशाने बुद्ध पहाटला मंजुरी

By Admin | Updated: May 9, 2017 01:05 IST2017-05-09T01:05:11+5:302017-05-09T01:05:11+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय पुतळ्याच्या बाजुला बुद्ध पहाट हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी होत असतो.

The order of the court granted the approval of Buddha | न्यायालयाच्या आदेशाने बुद्ध पहाटला मंजुरी

न्यायालयाच्या आदेशाने बुद्ध पहाटला मंजुरी

जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली होती परवानगी
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय पुतळ्याच्या बाजुला बुद्ध पहाट हा धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी होत असतो. गत सहा वर्षांपासून हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाकरिता न.प. मुख्याधिकारी, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्यात आली. मात्र सदर कार्यक्रमाला प्रशासकीय स्तरावर शांतता क्षेत्रातील नियमाचा भंग होत असल्याचे म्हणत परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंड पीठात याचिका दाखल केली. यावर नागपूर खंड पिठाने दिलेल्या आदेशावरुन सदर कार्यक्रमाला परवानगी मिळाली आहे. १० मे रोजी पहाटे ४.४५ वाजता आयोजित बुद्ध पहाट कार्यक्रमाला सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Web Title: The order of the court granted the approval of Buddha