शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या विलिनिकरणास खातेदारांचा विरोध

By admin | Updated: December 22, 2016 00:26 IST

येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ३० डिसेंबरपासून आर्वी शाखेत स्थानांतरीत करण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतला आहे.

२७ गावांतील १३ सेवा सोसायट्या संलग्नित रोहणा : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा ३० डिसेंबरपासून आर्वी शाखेत स्थानांतरीत करण्याचा निर्णय प्राधिकृत अधिकारी समितीने घेतला आहे. तत्सम पत्र शाखेला प्राप्त झाले; पण खातेदार, ठेवीदार, शेतकरी, शेतमजूर तसेच लघु व्यावसायिक यांचे हित लक्षात घेता सदर शाखा स्थानांतरीत करू नका, अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे. वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची रोहणा येथे गत ४० ते ४५ वर्षांपासून शाखा आहे. शाखेशी वडगाव, दिघी, सायखेडा, धनोडी, पिपरी, बोथली, पांजरा, किन्हाळा, सावंगी, गौरखेडा, पाचोड, सालदरा, कृष्णापूर, खैरी, रामपूर, विरूळ, सोरटा, रसूलाबाद, काकडदरा, निजामपूर, टाकळी, बोदड, पिंपळगाव, वडाळा, सावरखेडा, सालफळ, वाई, पिंपळझरी या २७ गावांतील १३ विविध कार्यकरी सेवा सहकारी संस्था संलग्न आहेत. एखाद्या मोठ्या कार्यक्षेत्रातील शेतकरी, शेतमजूर लहान-मोठे व्यावसायिक या शाखेचे ग्राहक, ठेवीदार व कर्जदार आहेत. २०१२-१३ पासून जिल्हा बँक आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. परिणामी, जिल्ह्यातील सर्व शाखेतील आर्थिक व्यवहार ठप्प होते. या शाखेतील अनेक ठेविदारांच्या पाच कोटींच्या वरील ठेवी अडकून पडल्या आहे. आठ ते दहा हजार ग्राहकांना आर्थिक फटका बसला आहे. बँकेच्या याच शाखेचे शेतकरी, नोकरदार व व्यावसायिकांकडे सात कोटींवर कर्ज थकित आहे. जिल्ह्यातील इतर शाखांचीही हीच अवस्था आहे. काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेचा परवाना पुनर्जीवित केल्याने वसुली येणे सुरू झाले. यातून ठेवीच्या १० टक्के रक्कम ग्राहकांना परत करणे सुरू आहे. सहकारी बँकेवर ग्राहकांचा विश्वास आहे. बँकेच्या इमारतीचे भाडे, वीज व दूरध्वनी बील वाचावे म्हणून शाखा विलीन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. वर्षाकाठी केवळ ४२ हजारांचा खर्च रोहणा : येथील शाखेच्या इमारतीचे भाडे दरमहा अडीच हजार रुपये आहे. महिन्याकाठी वीज व दूरध्वनी बिलाचा खर्च एक हजार रुपयांपेक्षा अधिक नाही. वर्षाकाठी हा खर्च ४० ते ४२ हजाराचा आहे. एवढ्या कारणासाठी शाखा स्थानांतरीत करण्याचा निर्णय योग्य नसल्याचे मत खातेदार व्यक्त करीत आहेत. ही शाखा आर्वी येथे स्थानांतरीत झाल्यास बँकेची वसुली बंद होणार आहे. वसुली नसेल तर ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची प्रक्रिया ठप्प होईल. खातेदारांना प्रत्येक कामासाठी आर्वीला जावे लागेल. कर्मचारी नाही. लिंक नाही, अशा कारणांचा त्रास होणार आहे. तसेच या कृतीमुळे परिसरातील गरीब शेतकरी, शेतमजुरांचा मोठा आर्थिक फटका बसेल. मिळेल तिथून कर्ज घेऊन ते त्रास होईपर्यंत भरायचे नाही, अशी मानसिकता असलेल्या कर्जदारांचे फावणार आहे. यामुळे ही शाखा आर्वी येथे स्थानांतरीत करू नये, असा ठराव ग्रामपंचायतीने ग्रामसभेत पारित केला. जि.प. सदस्य हितेंद्र बोबडे यासह राजेंद्र पावडे हे भाजपा नेत्यांच्या माध्यमातून यासाठी प्रयत्नशील आहेत. जनमंचनेही तत्सम मागणी केली आहे.(वार्ताहर)