शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

मुनगंटीवारांनाच जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राहू द्या !

By admin | Updated: July 9, 2016 02:14 IST

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे.

मुख्यमंत्र्यांना साकडे : मंत्रिमंडळ विस्तार होताच पालकमंत्री बदलाची चर्चावर्धा : फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शुक्रवारी विस्तार होताच जिल्ह्यात पालकमंत्री बदलाची चर्चा सर्वत्र होऊ लागली आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धेसह त्यांच्या चंद्रपूर या गृह जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आहे. मंत्री मंडळाच्या विस्तारानंतर ते वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडतील, अशी चर्चा वर्धेकरांना अस्वस्थ करीत आहे.इतकेच नव्हे, तर ना. सुधीर मुनगंटीवार यांनी पालकमंत्रीपद सोडले, तर मंत्रिमंडळाच्या विस्तारात राज्यमंत्रीपदी वर्णी लागलेले मुंबईतील डोंबीवलीचे भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांना वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळणार, अशीही चर्चा रंगत आहे. मंत्री मंडळ विस्तारापूर्वी यवतमाळचे आमदार मदन येरावार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार असून त्यांच्याकडे वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पद येणार अशी चर्चा होती. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, परंतु मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर ही चर्चा मागे पडली असून ना. रवींद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. वर्धेतील लोकप्रतिनिधींचे मुख्यमंत्र्यांना साकडेवर्धा : अर्थमंत्री व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद स्वीकारल्यापासून जिल्ह्याच्या विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतुद व्हायला लागली. आघाडी सरकारच्या काळातील सेवाग्राम विकास आराखड्याच्या कामाला गतीच आली नाही, तर निधीचीही तरतुद करण्यात आली. दरम्यानच्या काळात जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सुरू असलेली वाटचाल बघता भविष्यात वर्धा विकासात अगे्रसर राहील, असे चित्र निर्माण झाले. त्यांनी केवळ विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला नाही, तर जिल्ह्याच्या विकासाची दिशाही निश्चित केली आहे. अशातच त्यांच्याकडून पालकमंत्रीपद निघाले, तर विकासाची गती खुंटतील, अशी भीतीही वर्धेकरांना सतावू लागली आहे. वर्धा जिल्ह्याचे खा. रामदास तडस, आ. डॉ. पंकज भोयर, आ. समीर कुणावार हे सेवाग्राम विकास आराखड्याबाबतची बैठक आणि मंत्रिमंडळ विस्ताराच्या निमित्ताने मुंबईत आहेत. त्यांनाही पालकमंत्री बदलाची चाहुल लागताच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घालून ना. सुधीर मुनगंटीवार यांनाच पालकमंत्री म्हणून कायम ठेवावे, असा आग्रह धरला आहे. सोबतच सुधीर मुनगंटीवार यांनाही वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सोडू नये, यासाठी साकडे घातल्याची माहिती आहे. याबाबत खा. रामदास तडस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबीला दुजोरा दिला. आज रात्री मुख्यमंत्र्यासोबत बैठक होणार असून यावेळीही ही मागणी त्यांच्या पुढे ठेवण्यात येणार असल्याचेही खा. तडस म्हणाले.(जिल्हा प्रतिनिधी)