शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

दारूचे व्यसन थांबविल्यावरच राष्ट्रीय विकास शक्य

By admin | Updated: June 14, 2014 23:48 IST

दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार

जनजागरण मोहिमेचा दुसरा टप्पा : अंनिसचा उपक्रमवर्धा : दारू पिणाऱ्या शंभरातून किमान दहा व्यक्ती रोज दारूचे व्यसन करतात. त्यामुळे श्रम, वेळ, पैसा वाया जातो. मात्र त्याला त्याचे काहीही वाटत नाही. म्हणूनच दारूचे व्यसन हा आपल्या देशातील सर्वात गंभीर आजार असल्याचे मत महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे राज्यसरचिटणीस गजेंद्र सुरकार यांनी व्यक्त केले.आंजी येथील विठ्ठल मंदीरात मार्गदर्शन करताना सुरकार बोलत होते. चेतना विकास या सामाजिक संस्थेतर्फे दारूच्या गंभीर परिणामामुळे होणारे कौटूंबिक वाद, मारहाण, अपघात, घटस्फोट आदींच्या प्रबोधनाकरिता संस्थेच्या मैत्री केंद्र व समाधान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. यांतर्गत हिंगणघाट तालुक्यातील कोरा, आष्टी तालुक्यातील माणिकनगर, वर्धा तालुक्यातील आंजी मोठी येथे महिलांसाठी जनजागरण मेळावे आयोजित करण्यात आले आहे.या प्रसंगी मंचावर व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक दादाराव मुन, बचतगटाच्या अध्यक्षा प्रभा बावणकर, चेतना विकासचे संचालक मुरलीधर मोरे, शिबिर प्रमुख वर्षा ठाकरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.सुरकार दारूमुळे होत असलेल्या अपायावर मार्गदर्शन करताना म्हणाले, दारू एकही चांगली गोष्ट होवू देत नाही. शारीरिक, मानसिक, नैतिक पातळीवर दारू व्यक्तीला उद्ध्वस्त करते. दारू पिणारा संशयी होतो. त्यांना भ्रम होवू लागतात. तो खोटा बोलतो, घरातून पैसे चोरण्यापासून घरातील लोकांना मारझोड करतो. प्रसंगी आत्महत्या करतो किंवा दुसऱ्याची हत्या करतो. म्हणूनच दारूचे व्यसन हा कौटूंबिक, सामाजिक व राष्ट्रीय आजार आहे. त्याला थांबविणे म्हणजे राष्ट्राचा विकास होय असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. दारूचे व्यसन असलेल्या पुरुषाच्या पत्नीला दिव्यातून जावे लागते. त्यामुळे तिला काही प्राथमिक उपचार माहिती असने आवश्यक असते. त्यामुळे दादाराव मुन यांनीही औषध व प्रथमोपचाराची माहिती दिली. यावेळी माणिकनगर येथील मेळाव्यास सरपंच काशिनाथ धुर्वे तर कोरा येथे ग्रामपंचायत सदस्या संगिता तामगाडगे, महिला मंडळाच्या अध्यक्ष कुसुम झोडपे प्रामुख्याने उपस्थित होत्या. सोबतच आसपासच्या अनेक गावातील महिला या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. संचालन मनीषा यादलकर यांनी केले. आभार विमल पांडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उज्ज्वला वैद्य, छाया महल्ले, विना नाखले, शिला तामसे, लिला सुटे, संध्या सातपुते, शारदा बोरकुटे यांनी परिश्रम घेतले.(शहर प्रतिनिधी)