शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पाव एकरात घेतले १.२० लाखांच्या कांद्याचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 05:00 IST

देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणून चुलीतील राखड दिली. तर वेळोवेळी या पिकाला सिंचन करण्यात आले. अल्पावधीतच हे पीक उत्तम स्थिती आल्यावर कांदा पीक काढण्यात आले.

ठळक मुद्देसेंद्रिय पध्दतीचा केला अवलंब

लोकमत न्यूज नेटवर्कविजयगोपाल : पारंपारीक शेतीला फाटा देत तांभा येथील युवा शेतकरी श्रीकांत रामदास वाघाडे यांनी अवघ्या पाव एकरात कांद्याची लागवड करून तब्बल १.२० लाखांचे उत्पन्न घेतले आहे. सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करून करण्यात आलेला शेतकरी श्रीकांत यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.देवळी तालुक्यातील तांभा (येंडे) येथील शेतकरी श्रीकांत वाघाडे यांनी पाव एकरात कांदा पिकाची लागवड केली. या पिकाला कुठलेही रासायनिक खत न देता त्याची योग्य पद्धतीने निगा राखण्यात आल्याने पीकही बऱ्यापैकी बहरले. शेतकरी श्रीकांत यांनी कांदा पिकाला खत म्हणून चुलीतील राखड दिली. तर वेळोवेळी या पिकाला सिंचन करण्यात आले. अल्पावधीतच हे पीक उत्तम स्थिती आल्यावर कांदा पीक काढण्यात आले. अवघ्या पाव एकरात तब्बल एक लाख २० हजार रुपये मिळेल इतके कांद्याचे उत्पन्न या शेतकऱ्याला प्राप्त झाले आहे. शेतकरी श्रीकांत वाघाडे याने केलेला यशस्वी प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.  

अखेरपर्यंत आला २० हजार खर्चपाव एकरात कांदा पिकाची लागवड करण्यासह पीक काढणीपर्यंत शेतकरी श्रीकांत यांना केवळ २० हजार रुपये खर्च आल्याचे तो सांगतो.

पारंपारिक व्यवसायाला दिला फाटायुवा शेतकरी श्रीकांत यांचे वडिल मासे पकडण्याचा व्यवसाय करायचे. पण अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर त्यांनी हा व्यवसाय सोडून शेतीवर भर दिला. पारंपारिक पद्धतीने शेती करीत असताना त्यांना अनेक वेळा तोटा सहन करावा लागला. याच पाश्वभूमिवर श्रीकांत यांनी शिक्षणासोबत मासे पकडण्याच्या पारंपारिक व्यवसायाला फाटा देत शेतीत आवड दर्शविली. त्यानंतर हा नवीन प्रयोग केला. 

माझा वडिलांची पांरपारीक मच्छी पकडण्याचा व्यवसाय सोडुन त्यांनी आजोबांची शेती करायला सुरवात केली. पण अर्धांगवायूच्या झटक्यानंतर वडिल घरी बसले. त्यानंतर मी शेतीत रुची दर्शवित पाव एकरात कांद्याची लागवड केली. खत म्हणून चुलीतील राख या पिकाला देण्यात आली. शिवाय सेंद्रिय पद्धतीचा वापर करून या पिकाची निगा राखली. मला खर्च वजा जाता एक लाखाचा निव्वळ नफा अपेक्षीत आहे.- श्रीकांत वाघाडे, शेतकरी, तांभा (येंडे).

 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती