शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ऑईलसाठा हटविला, अनधिकृत गाळे कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:01 IST

प्रशासनाकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाच्या आदेशानंतर अपार्टमेंट मालकाने ऑईलसाठा हटविला पण, पार्कींगमधील अनधिकृत बांधकाम कायम असल्याने ते बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी सदनिकाधारकांनी केली आहे.

ठळक मुद्देहेरिटेज प्लाझा येथील प्रकार : अवैध बांधकाम पाडा, सदनिकाधारकांची तक्रारीतून केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कारला चौक परिसरातील हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटच्या मालकाने सदनिकाधारकांच्या पार्कींगमध्ये अनधिकृत गाळे बांधून त्या ठिकाणी विनापरवानगी ऑईलचा साठा करुन ठेवला होता. यासंदर्भात प्रशासनाकडे तक्रार करुनही कारवाई होत नसल्याने सदनिकाधारकांच्या तक्रारीवरुन लोकमतने वृत्त प्रकाशित करताच प्रशासन खडबडून जागे झाले. प्रशासनाच्या आदेशानंतर अपार्टमेंट मालकाने ऑईलसाठा हटविला पण, पार्कींगमधील अनधिकृत बांधकाम कायम असल्याने ते बांधकाम तत्काळ पाडण्यात यावे, अशी मागणी सदनिकाधारकांनी केली आहे.शहरातील मे. पुष्पदत्त बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक विलास मानलवार यांच्या मालकीच्या कारला चौकातील जागेवर हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटची निर्मिती केली आहे. या ठिकाणी सहा सदनिका असून त्याची विक्रीही सदनिकाधारकांना करुन दिली आहे. दरम्यान अपार्टमेंट मालक मानलवार यांनी तीन सदनिकाधारकांच्या पार्कींगमध्ये अनधिकृतरित्या दुकानाचे गाळे काढून ते स्वत: ताब्यात ठेवले. तसेच त्या गाळ्यामध्ये ज्वलनशील पदार्थ असलेल्या इंजिनऑईलचा साठा करुन ठेवला होता. यासंदर्भात वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाने कारवाईला गती दिली. नगररचनाकार विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हेरिटेज प्लाझा अपार्टमेंटला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर दिलेल्या सूचनेवरुन या ठिकाणचा सर्व ऑईलसाठा हटविण्यात आला आहे. मात्र, गाळ्यांचे अनधिकृत बांधकाम कायम असून ते बांधकाम तत्काळ पाडून सदनिकाधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पी.टी.पांडे, विशाल उराडे, दीपक देशमुख व माधव शेरकुले या सदनिकाधारकांनी तक्रारीतून केली आहे.पोलीस आले अन् निघून गेलेहेरिटेज प्लाझा येथे ज्वलनशील पदार्थ साठवून ठेवल्यासंदर्भात सदनिकाधारकांनी २६ मार्च रोजी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार २४ एप्रिलला पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात ऑईलसाठा आढळून आला होता. पोलीस कर्मचारी पाहणी करीत असतानाच अचानक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन खणखणल्याने कारवाईकरिता आलेल्या पोलिसांना कारवाई न करताच परतावे लागले. त्यानंतर पुढे कारवाईकडे कानाडोळा करण्यात आला होता. आता लोकमतने वृत्त प्रकाशित करताच कारवाईला गती मिळाल्याचेही सदनिकाधारकांनी बोलून दाखविले आहेत.